पंतप्रधानांच्या निवासस्थानी गोळीबार; श्रीलंकेत 12 मंत्र्याची घरे जाळली
10 May :- श्रीलंकेतील आर्थिक संकटामुळे निर्माण झालेला असंतोष आता गृहयुद्धाला कारणीभूत ठरू शकतो. सोमवारी पंतप्रधान महिंदा राजपक्षे यांनी विरोधकांच्या दबावाखाली राजीनामा दिला. त्यांच्या राजीनाम्यामुळे नाराज झालेल्या समर्थकांनी राजधानी कोलंबोमध्ये हिंसक घटना घडवून आणल्या. यानंतर त्यांचे विरोधकही संतापले.
जेव्हा राजपक्षे यांच्या समर्थकांनी कोलंबो सोडण्याचा प्रयत्न केला, तेव्हा त्यांच्या वाहनांना ठिकठिकाणी लक्ष्य करण्यात आले. दुसरीकडे, आंदोलकांनी हंबनटोटा येथील महिंदा राजपक्षे यांचे वडिलोपार्जित घर जाळले. त्याचवेळी राजधानी कोलंबोमध्ये माजी मंत्री जॉन्सन फर्नांडो यांना कारसह तलावात फेकण्यात आले.
आतापर्यंत 12 हून अधिक मंत्र्यांची घरे जाळली गेली आहेत. श्रीलंकेत अडकलेल्या भारतीयांसाठी हेल्पलाइन क्रमांक +94-773727832 आणि ईमेल आयडी [email protected] जारी करण्यात आला आहे. पंतप्रधानांच्या अधिकृत निवासस्थान ‘टेम्पल ट्री’चे मुख्य गेट तोडले आणि येथे उभ्या असलेल्या ट्रकला आग लावण्यात आली. यानंतर निवासस्थानाच्या आतही गोळीबार करण्यात आला. आंदोलक जमावाला नियंत्रित करण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या आणि हवेत गोळीबार केला.