महाराष्ट्र

राणा दाम्पत्याला जामीन मंजूर, तरीही आजची रात्र जेलमध्येच

ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

4 May :- 23 एप्रिलपासून राजद्रोहाच्या आरोपाखाली भायखळा तुरुंगात असलेल्या अमरावतीचे अपक्ष खासदार नवनीत राणा आणि त्यांचे आमदार पती रवी राणा यांना मुंबई सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. 30 एप्रिल रोजीच न्यायालयाने या प्रकरणाचा निकाल 2 मेपर्यंत राखून ठेवला होता. न्यायालयाने त्यांना आता सशर्त जामीन मंजूर केला; परंतू जामिनाची प्रक्रीया आज होऊ शकली नाही त्यामुळे त्यांची आजची रात्र जेलमध्येच जाणार असल्याचे स्पष्ट झाले.

दोघांनाही 50 हजारांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर हा जामीन देण्यात आला आहे. सोमवारी वाढीव मुदतीमुळे मुंबईच्या दिवाणी व सत्र न्यायालयाचे उर्वरित न्यायाधीश आर. एन. रोकडे यांची ऑर्डर पूर्ण होऊ शकली नव्हती. राणा दाम्पत्य मागील बारा दिवसांपासून तुरुंगात होतं. त्यांच्यावर राजद्रोहासारखा गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यामुळे त्यांना आज जामीन मिळणार की नाही? याबाबत शंका व्यक्त केली जात होती. पण मुंबई सत्र न्यायालयाचे न्यायाधीश राहुल रोकडे यांना बचाव पक्षाचा युक्तीवाद मान्य झाला. त्यानंतर त्यांनी विविध अटींसह राणा दाम्पत्याला जामीन मंजूर केला आहे.

रवी राणा हे सध्या तळोजा तुरुंगात आहेत. तर नवनीत राणा या भायखळा येथील महिला तुरुंगात आहेत. पुढील काही वेळातच जामीन आदेश दोन्ही तुरुंगाना पाठवण्यात येणार आहे. त्यामुळे राणा दाम्पत्याची बारा दिवसांनंतर सुटका होणार आहे. राणा दाम्पत्यांना जामीन मंजूर करण्यात आला असला तरी, त्यांच्यावर अनेक प्रकारचे निर्बंध लादण्यात आले आहेत. त्यांना संबंधित प्रकरणावर माध्यमांशी बोलता येणार नाही. न्यायालयाचा हा निर्णय राज्य सरकारशी मोठा धक्का मानला जात आहे.

न्यायालयाने राणा दाम्पत्याची अटक बेकायदेशीर ठरवली आहे. अटकेपूर्वी राणा दाम्पत्याला नोटीस देणं गरजेचं होतं. अशी कोणतीही कायदेशीर प्रक्रिया पार न पाडता मुंबई पोलिसांना त्यांना अटक केली. त्यामुळे बचाव पक्षाचा युक्तीवाद न्यायालयाने मान्य करत राणा दाम्पत्याला जामीन मंजूर केला आहे. राणा दाम्पत्याला जामीन मंजूर झाल्यानंतर सरकारी वकील प्रदीप घरत यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं की, “राणा दाम्पत्याला जामीन मंजूर करण्यात आला असला तरी न्यायालयाने त्यांच्यावर काही अटी घातल्या आहेत.

संबंधित प्रकरणी माध्यमांशी बोलण्यास सक्त मनाई केली आहे. तसेच साक्षीदारांशी कोणत्याही प्रकारे संपर्क साधण्यास अथवा त्यांच्यावर दबाव टाकण्यास मनाई करण्यात आली आहे. शिवाय पोलिसांना तपासकार्यात सहकार्य करावं आणि पोलिसांकडून नोटीस दिल्यानंतर चोवीस तासांच्या आत चौकशीसाठी पोलीस ठाण्यात हजर राहावं, अशा विविध अटी न्यायालयाकडून घालण्यात आल्या आहेत.”