मनसेचे शक्तिप्रदर्शन
ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप
16 April :- मनसे प्रमूख राज ठाकरे यांनी भोंग्याच्या मुदा अजेंड्यावर घेतल्यानंतर महाराष्ट्रातील राजकारण चांगलेच तापले आहे. आता सर्वच पक्षांनी हनुमान चालिसा पठण करण्याचा सपाटा लावला असून आपल्या वक्तव्यानंतर प्रत्यक्ष कृतीसाठी राज ठाकरे पुण्यात आले आहेत. त्यांच्या पुण्यातील राजमहल या निवासस्थानातून ते निघाले असून ते थेट खालकर तालिम चौकातील हनुमान मंदीरात पोहचले आहेत.
राज ठाकरे यांच्यासोबत मनसे नेते बाळा नांदगावकरही हनुमान मंदीरात आले आहेत. खालकर चौकात राज ठाकरे यांचे मनसैनिकांनी जंगी स्वागत केले. सर्व कार्यकर्ते आणि नागरीकांच्या मधोमध राज ठाकरे उभे असून त्यांनी हनुमानाचे दर्शन घेतले. त्यानंतर आरती करण्यात आली. आता थोड्यात वेळात हनुमान चालिसाचे पठण ते करतील.
राज ठाकरे येताच जय श्रीराम, पवनपुत्र हनुमान की जय असा जयघोष करण्यात आला. त्यानंतर राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांची काही वेळ वार्तालाप करून आरती केली त्यानंतर रामनामाचा आणि हनुमानाचा जयघोष करण्यात आला. यावेळी मोठा उत्साह पाहायला मिळाला.
खालकर चौकातील हनुमान चालिसा पठण हे राज ठाकरे यांच्या शक्तीप्रदर्शनाचाच एक भाग होता. आणि दुसरी गोष्ट हिंदु जननायक म्हणून हिंदुत्ववादी प्रतिमा तयार करण्याचा त्यांचा प्रयत्न होता. तत्पुर्वी खालकर चौकात मनसैनिकांची गर्दी झाली, महिलांचीही यावेळी मोठी संख्या दिसून येत आहे. पुण्यातील पदाधिकारी कार्यकर्त्यांनी राज ठाकरे यांच्या स्वागतासाठी जय्यत तयारी केली.