महाराष्ट्र

गुणरत्न सदावर्तेंना 4 दिवसांची पोलिस कोठडी

ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

15 April :- एसटी संपकऱ्यांचे वकिल गुणरत्न सदावर्ते यांना सातारा कोर्टाने 4 दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. दीड वर्षापूर्वी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर एका वृत्तवाहिनीला मुलाखत देताना त्यांनी समाजात तेढ निर्माण होईल, असे वक्तव्य केले. तसेच, यादरम्यान खासदार छत्रपती संभाजीराजे भोसले व उदयनराजे यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केले, असा आरोप त्यांच्यावर आहे. याप्रकरणी अधिक चौकशी करण्यासाठी सदावर्ते यांची 14 दिवसांची पोलिस कोठडी मिळावी, अशी मागणी पोलिसांकडून करण्यात आली होती. मात्र, न्यायालयाने सातारा पोलिसांना 4 दिवसांची पोलिस कोठडी मंजूर केली आहे.

छत्रपती खासदार संभाजीराजे व उदयनराजे यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी गुणरत्न सदावर्ते यांनी आज सातारा कोर्टात माफीदेखील मागितली. सुनावणीबाबत माहिती देताना सरकारी वकिलांनी सांगितले की, सुरुवातीला सदावर्ते यांनी आपण असे काही वक्तव्य केलेच नाही, असा दावा केला. मात्र याबाबत आमच्याकडे लेखी व व्हिडिओसदृश पुरावे होते. ते आम्ही कोर्टात सादर करत आरोपींचा दावा खोडून काढला. त्यामुळे आरोपींना माघार घ्यावी लागली व त्यांनी असे वक्तव्य केल्याबद्दल कोर्टात माफी मागितली, अशी माहिती वकिलांनी दिली. तसेच, यापुढे छत्रपतींच्या घराण्याबद्दल बेजबाबदार वक्तव्य करू नये, अशी समजदेखील त्यांना दिल्याचे वकिलांनी सांगितले.

एसटी संपकऱ्यांचे वकिल गुणरत्न सदावर्ते यांना सातारा कोर्टाने 4 दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. दीड वर्षापूर्वी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर एका वृत्तवाहिनीला मुलाखत देताना त्यांनी समाजात तेढ निर्माण होईल, असे वक्तव्य केले. तसेच, यादरम्यान खासदार छत्रपती संभाजीराजे भोसले व उदयनराजे यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केले, असा आरोप त्यांच्यावर आहे. याप्रकरणी अधिक चौकशी करण्यासाठी सदावर्ते यांची 14 दिवसांची पोलिस कोठडी मिळावी, अशी मागणी पोलिसांकडून करण्यात आली होती. मात्र, न्यायालयाने सातारा पोलिसांना 4 दिवसांची पोलिस कोठडी मंजूर केली आहे.