महाराष्ट्र

केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांचा गौप्यस्फोट

ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

20 March :- राज्यात महाविकास आघाडीविरुद्ध भाजप हा संघर्ष जनतेला नवा राहिलेला नाही. यातच राज्याचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत पेन ड्राईव्ह सादर केला होता. यात गिरीश महाजन यांना विनाकारण एखाद्या प्रकारात अडकवण्याचा कट रचला जात आहे, त्याचे पुरावे दिले होते. यानंतर राज्यभरात खळबळ उडाली होती. तर आता केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी अजून 4 पेन ड्राईव्ह बाहेर येतील असा गौप्यस्फोट केला आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी दाखल केलेल्या पेन ड्राईव्हमध्ये खरे पुरावे नाहीत, तर प्रवीण चव्हाण यांचा राजीनामा का घेतला, असा सवाल रावसाहेब दानवे यांनी उपस्थित केला आहे. पेन ड्राईव्हमध्ये सर्व खरे आहे, म्हणूनच आम्ही चौकशीची मागणी केली, असे सांगत सर्व दोषीवर कारवाई व्हावी, अशी मागणी दानवेंनी केली आहे. सीडी कधी येते याची वाट बघतोय, मग आम्ही अजून ४ पेन ड्राईव्ह बाहेर काढू, असा टोला रावसाहेब दानवेंनी एकनाथ खडसे यांना लगावला आहे.