बीड

राज्यातील शालेय विद्यार्थ्यांना उन्हाळी सुट्टी जाहीर

ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

12 April :- राज्यभरातील शाळांना येत्या 2 मे पासून उन्हाळी सुट्ट्या लागणार आहे. 2 मे ते 12 जूनपर्यंत यंदा उन्हाळ्याची सुट्टी असणार आहे. त्यानंतर पुन्हा 13 जूनपासून शाळा सुरू होईल. तर तिकडे विदर्भात मात्र, 27 जूनपर्यंत शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. परिक्षांचा निकाल देखील सुट्टीच्या काळात घोषित केला जाणार आहे.

राज्यातील शाळांना 2 मेपासून उन्हाळी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. 2 मे ते 12 जून यंदा उन्हाळ्याची सुट्टी असणार आहे. शाळा पुन्हा 13 जूनला भरवण्यात येणार आहे. तर विदर्भातील शाळांना 27 जूनपर्यंत सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. परीक्षांचे निकाल सुटीच्या काळात घोषित करता येणार आहेत. राज्यात उन्हाचा पारा वाढत असल्याने नागपुरात शाळांची वेळ बदल्यात आली आहे. नागपुरातील शाळा सकाळी साडेदहा पर्यंत सुरु राहणार आहेत. महापालिका आयुक्तांनी याबाबतचे नवे आदेश काढलेत.

गेल्या आठवड्याभरात नागपुरात उन्हाचा तडाखा प्रचंड वाढला. त्यामुळे वेळेत बदल करण्याचा निर्णय घेण्यात आला. विद्यार्थ्यांची मार्चमध्ये परिक्षा संपली की एप्रिलच्या पहिल्याच आठवड्यात उन्हाळ्याच्या सुट्या मिळत होत्या. मात्र यावर्षी संपुर्ण मार्च आणि एप्रिल महिनाभर पुर्णवेळ शाळा असणार आहे. इतकच नाही तर रविवारीही ऐच्छिक असल्यास शाळा सुरु ठेवण्यात परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे यंदा विद्यार्थ्यांना एप्रिलमध्ये उन्हाळ्याची सुटी 2 मे पासून मिळणार आहे.