बीड

कनकालेश्वर महोत्सव; तरंगत्या रंगमंचावर नृत्याविष्कार

ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

3 april :- बीडमध्ये संस्कार भारतीच्या वतीने कनकालेश्वर महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं. या महोत्सवाचे वैशिष्ट्य म्हणजे तरंगत्या रंगमंचावर नृत्याविष्कार सादर करण्यात आलाय. बीड शहरातील कंकालेश्वर मंदिर परिसरात असणाऱ्या पाण्याच्या कुंडात या महोत्सवाचं आयोजन करण्यात येत असते, परंतु सलग दोन वर्ष या कार्यक्रमास खंड पडला होता. आता निर्बंध हटल्यानंतर हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला आहे.

कनकालेश्वर महोत्सवाचे यंदाचं हे 26 वे वर्ष आहे. या तरंगत्या रंगमंचावर प्राजक्ता आपोनारायण यांच्या टीमने नृत्याविष्कार सादर केलाय. हा महोत्सव पाहण्यासाठी बीडकरांनी गर्दी केली होती. बीडचे नगराध्यक्ष डॉ.भारतभूषण क्षीरसागर यांच्या हस्ते या महोत्सवाचं उद्घाटन करण्यात आले. काव्यरंग, स्मरण स्वातंत्र्यवीरांचे अशा विविध कार्यक्रमांनी हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला आहे.