Newsव्हिडिओ

पालकमंत्री धनंजय मुंडे गोपीनाथ गडावर नतमस्तक !

लोकनेते गोपीनाथ मुंडे यांची आज 6वी पुण्यतिथी आहे. त्यानिमित्त पालकमंत्री धनंजय मुंडे हे गोपीनाथ गडावर जाऊन गोपीनाथ मुंडे यांच्या समाधी समोर नतमस्तक झाले. अप्पा, आज तुमचा स्मृतिदिन. तुम्ही कायम माझ्या गुरुस्थानी आहात.. तुमच्या आयुष्याचा अविभाज्य घटक असलेल्या ऊसतोड मजुर, कष्टकरी, वंचित-उपेक्षित, दीन दुबळ्यांची सेवा करण्याची संधी मला मिळाली. त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी, त्यांचा विकास साधण्यासाठी मला बळ द्या! असही ट्विट करत धनंजय मुंडे यांनी लोकनेते गोपीनाथ मुंडे यांना अभिवादन केले.