दरेकरांना न्यायालयाचा जोरदार धक्का
ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप
25 March :- विधानपरिषदेतील विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांना मुंबई बँक बोगस मजूर प्रकरणी मुंबई सत्र न्यायालयाने जोरदार धक्का दिला आहे. प्रविण दरेकर यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळण्यात आला आहे. प्रविण दरेकर यांनी मुंबई सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता.
प्रवीण दरेकरांच्या अटकपूर्व जामिनावर मुंबई सत्र न्यायालयात दोन दिवसांपूर्वी सुनावणी झाली होती. यावेळी न्यायालयाने 25 मार्चपर्यंत निर्णय राखीव ठेवला होता. आज न्यायालयने आपला निर्णय जाहीर केला आहे.न्यायालयाच्या निकालानंतर प्रविण दरेकर यांनी न्यायालयावर विश्वास असल्याचे म्हटलं. माझा जामीन फेटाळला आहे. मी कायद्याचे पालन करणारा नागरिक असून मला न्याय मिळेल, माझा उच्च न्यायालयावर विश्वास आहे, असे प्रविण दरेकर म्हणाले.
मुंबईत आपच्या धनराज शिंदे यांच्या तक्रारीनंतर प्रविण दरेकर यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. यानंतर, तिथं मुंबई उच्च न्यायालयात प्रविण दरेकर यांचा अर्ज फेटाळण्यात आला होता. त्यांना सत्र न्यायालयात जाण्यास सांगण्यात आलं होतं. यानंतर प्रविण दरेकर सत्र न्यायालयात गेले होते. तिथं त्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळण्यात आला आहे.
पोलिसांनी प्रविण दरेकरांना कोठडीत घेऊन चौकशी करण्याची गरज असल्याची बाजू मांडली होती. राज्यातील सत्ताधारी पक्षाने त्यांच्या अटकेची मागणी केली आहे, तर दरेकरांवर राजकीय सूडबुद्धीने कारवाई केल्याचा आरोप भाजपने केला आहे.