महाराष्ट्र

पेट्रोल-डिझेलच्या दरात पुन्हा वाढ

ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

25 :- गेल्या 4 दिवसांपासून सुरू झालेला इंधन दरवाढीचा भडका आजही कायम आहे. आज शुक्रवारी तेल कंपन्यांनी पेट्रोलच्या दरात 80 पैशांनी तर डिझेलच्या दरात 75 पैशांनी वाढ केली आहे. आजपासून नवे दर लागू झाले आहेत. सततच्या इंधन दरवाढीमुळे गेल्या चार दिवसांत पेट्रोल तब्बल 2 रुपये 40 पैशांनी महागले आहे. आता मुंबईत पेट्रोल 112.51 रुपये/लिटर आणि डिझेल 96.70 रुपये/लिटर मिळणार आहे.

मागील 4 दिवसांत पेट्रोल-डिझेलमध्ये झालेली हि तिसरी दरवाढ आहे. त्यामुळे सामान्यांकडूनही आता संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. देशभरातील महानगरांच्या तुलनेत मुंबईत पेट्रोलचे दर सर्वाधिक आहे. तसेच, राज्यातील शहरांमध्येही पेट्रोल सर्वाधिक महागडे आहेत. त्यामुळे राज्यातील नागरिकांना या दरवाढीची सर्वाधिक झळ बसणार आहे.

देशभरात पेट्रोलचे दर 97 ते 98 रुपयांच्या आसपास आहे. मात्र, मुंबईसह राज्यातील सर्व शहरांमध्ये पेट्रोलचे प्रतिलिटर दर 112 रुपयांच्या पुढे गेले आहे. आज झालेल्या दरवाढीनंतरही दिल्लीत पेट्रोल 97.81 रुपये/लिटर आणि डिझेल 89.07 रुपये/लिटर मिळत आहे. तर अहमदाबादमध्ये पेट्रोल 97.52 रुपये/लीटर आणि डिझेल 91.61 रुपये/लीटर झाले आहे. या शहरांमध्ये पेट्रोलचे दर राज्यातील दरापेक्षा 3 रुपयांनी कमी आहे.