महाराष्ट्र

शिक्षणमंत्र्यांची मोठी घोषणा! वाचा, मराठी माध्यमांच्या विद्यार्थ्यांना काय काय मिळणार?

ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

22 March :- राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी मराठी माध्यमांसाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. मराठी माध्यमांमध्येही आता पहिलीपासूनच इंग्रजीची ओळख करुन दिली जाणार आहे.

मराठी माध्यमांच्या पुस्तकांमध्ये इंग्रजी शब्दांचादेखील वापर करण्यात येणार आहे. त्यामुळे मराठीसोबतच विद्यार्थ्यांच्या इंग्रजी संकल्पनाही स्पष्ट होतील, अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी विधानसभेत दिली आहे. त्यासोबतच महापालिका, जिल्हा परिषद अशा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये शिकणाऱ्या पहिली ते आठवीच्या सर्व विद्यार्थ्यांना राज्य सरकारतर्फे मोफत गणवेशदेखील दिला जाणार आहे.

राज्यातील अनेक मराठी शाळा ओस पडल्या आहेत. पालकांचा इंग्रजी शाळांकडे जास्त ओढा आहे. आपले मुल स्पर्धेत मागे पडू नये, अशी यामागे पालकांची भावना असते. त्यामुळे यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून मुलांना रोजच्या वापरातील इंग्रजी शब्दांची ओळख करुन देण्यासाठी त्यांना द्विभाषिक पाठ्यपुस्तके दिले जातील. यात मुलांना मराठीसह इंग्रजी संकल्पनांचीही ओळख करून दिली जाईल, यातून मुलांचा इंग्रजींचा पाया पक्का होईल व ते स्पर्धेत मागे राहणार नाही, अशी माहिती वर्षा गायकवाड यांनी दिली आहे.

प्रत्येकाला आपल्या मातृभाषेत असलेल्या गोष्टी लवकर समजतात. त्याची गोडी त्याला असते, पण त्याचसोबत त्या शब्दाला इंग्रजी शब्द काय आहे, हे माहिती असावे म्हणून राज्य सरकारने हा निर्णय घेतला आहे, असे वर्षा गायकवाड यांनी सांगितले.

मुलांना पुस्तकांचे ओझे होणार नाही याकडे आपण लक्ष देत आहोत. त्यामुळे आपण सध्या फक्त पहिलीसाठी द्विभाषिक पाठ्यपुस्तके आणत आहोत. हळूहळू इतर वर्गांसाठी ते उपलब्ध करून दिले जातील, असेही वर्षा गायकवाड यांनी स्पष्ट केले.