पंतप्रधान मोदींनी घेतली खासदारांची बैठक
ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप
16 March :- महाराष्ट्राच्या राजकारणात बुधवारी मोठी घडामोड पाहायला मिळत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यातील सर्व भाजप खासदारांची बैठक घेतली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पंतप्रधानांनी खासदारांशी आगामी नागरी निवडणुका, राज्यात सुरू असलेला राजकीय गोंधळ यासह अनेक मुद्द्यांवर चर्चा केली आहे.
पंतप्रधानांच्या आजच्या बैठकीबाबत शिवसेनेचे राज्यसभा खासदार संजय राऊत म्हणाले, ‘पंतप्रधानांनी सर्व पक्षांच्या खासदारांना बोलावायला हवे होते. ते पंतप्रधान आहेत. मात्र या बैठकीत महाराष्ट्रातील भाजपच्या सर्व खासदारांना बोलावण्यात आले आहे. अशा परिस्थितीत मी ते एका पक्षाचे पंतप्रधान आहेत, असे म्हटले तर चुकीचे काय? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. तसेच असो, ते सोडा. आमच्या शिवसेना खासदारांचीही आज माझ्या घरी बैठक आहे. आम्हीही भेटत आहोत.’ अशी माहिती देखील राऊतांनी दिली आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या मुद्द्यांव्यतिरिक्त राज्यपालांनी पुन्हा एकदा विधानसभेच्या अध्यक्षपदाच्या निवडीचा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठवणे, देवेंद्र फडणवीस, प्रवण दरेकर आणि चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर राज्य सरकारकडून केलेल्या कारवाया अशा विषयांवर देखील चर्चा झाली. भाजप लवकरच अधिकृत निवेदन जारी करू शकते, असे मानले जात आहे.