बीड

पुढील 3 महिने वीज तोडणी होणार नाही; ऊर्जा मंत्र्यांची घोषणा!

ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

15 March :- विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात शेतकऱ्यांच्या वीज तोडणी वरून चांगलाच गदारोळ झाला. सत्ताधारी पक्षाचे आमदार बालाजी कल्याणकर यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नावर विरोधक आक्रमक झाल्याचे दिसून आले. विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी सत्ताधारी आमदारच वीज तोडणी वरून बोलत आहे, त्यामुळे यावर तात्काळ निर्णय घेण्याची मागणी केली.

विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात प्रवीण दरेकर यांच्यावर गुन्हा दाखल झाला असल्याबाबत प्रश्न उपस्थित केला. मात्र, संसदीय कार्य मंत्री अनिल परब यांनी या संदर्भात निवेदन देण्याचे आश्वासन दिले. त्याच वेळी आमदार बालाजी कल्याणकर यांनी शेतकऱ्यांच्या वीज तोडणीचा प्रश्न उपस्थित केला. यावर भाजप प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली. त्यामुळे वीज प्रश्नावर आजच सभागृहात चर्चा करावी अशी मागणी करण्यात आली.

या प्रश्नावर विरोधकांनी गदारोळ केला, त्यामुळे सभागृह काही काळासाठी तहकूब करावे लागले. सरकारच्या वतीने या प्रश्नावर चर्चा करण्याची तयारी दाखवण्यात आली. मात्र, आता चर्चा नको तर निर्णय घ्या, अशी मागणी करत फडणवीसांनी सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारला धारेवर धरले. शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन तोडणी तत्काळ थांबवा, शेतकऱ्यांची बाजू मांडली नाही तर ते आम्हाला फिरू देणार नाही, आम्ही कोणत्या तोंडाने त्यांच्या कडे जायचे,ए असा सवाल फडणवीस यांनी उपस्थित केला.