बीड

राज्य नाट्य स्पर्धेत चरक नाटकाचे दर्जेदार सादरीकरण

ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

15 March :- बीडमध्ये सध्या सांस्कृतिक संचालनालय आयोजित ६० वी महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धा सुरू आहे. ही स्पर्धा यशवंतराव चव्हाण नाट्यगृह बीड येथे संपन्न होत असून ही स्पर्धा येत्या २० मार्च पर्यंत चालणार आहे. यामध्ये बीडमधील एकुण ११ नाटकांचा समावेश आहे. काल दि.१ ५ मार्च २०२२ रोजी स्पर्धेतील पाचव्या दिवशी चे डॉ. सुधीर निकम लिखित आणि प्रा. विनोद दळवी दिग्दर्शित मराठी दोन अंकी चरक हे नाटक संपन्न झाले.

यामधुन समाजात घडणाऱ्या महिलांवरील अत्याचार आणि पिडीत कुटुंबाला भोगाव्या लागणाऱ्या यातना दाखवण्यात आल्या असून एक मोठा प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे. जो प्रत्येकाला माणुस म्हणुन विचार करायला लावणारा आहे. या दोन अंकी नाटक थरारक आणि रोमांचकारी असल्याने प्रेक्षकांचा देखील मोठा प्रतिसाद मिळाला.

यामध्ये कलाकार बापु सोनवणे, दत्ता घाडगे, अशोक काळकुटे, नेहा साबळे, योगिता सानप, अभिजित धानुरे, संतोष सातव, शुभम पिंगळे, निखिल केंजळे, द्वारकादास फटाले, अक्षय व्यवहारे, रोहन गायकवाड, नामदेव शिंदे, मधुकर परजने, छाया सोंडगे, सत्यम दळवी, बळवंत देशपांडे, रेणुका कांबळे, कोमल वाघमारे, गोपीनाथ धुताडमल, सुदर्शन कदम, कार्तिक ढाणे, विशाल कदम, श्रेयश कदम, रोहन गायकवाड, अशोक लोकरे, अश्विनी हक्कदार सह आदींनी काम केले. तर तांत्रिक कलावंत म्हणून संगीत संयोजन कबीर जाधव, आगळे वैष्णवी,प्रकाश योजना शेरकर लक्ष्मी, दृष्याबंध कोमल वाघमारे, किरण गायकवाड, संस्कार तुपे , वेशभूषा वर्षा दळवी ,रंगभूषा मनीषा दळवी यांनी पार पाडली आहे चरक नाटकास बीडच्या रसिक प्रेक्षकांनी भर भरून प्रतिसाद दिला .