क्रीडा

फिरकी गोलंदाजीच्या बादशाहची एक्सिट

ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

4 March :- क्रिकेट विश्वातून अत्यंत धक्कादायक वृत्त समोर आलं आहे. फिरकी गोलंदाजीचा बादशाह असणारा ऑस्ट्रेलियाचा महान फिरकी गोलंदाज शेन वॉर्नचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले​​​​​​. फॉक्स न्यूजनुसार, हृदयविकाराच्या झटक्याने त्याचा मृत्यू झाला. 52 वर्षीय वॉर्न हा ऑस्ट्रेलियाकडून कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज आहे. या फॉरमॅटमध्ये त्याने 145 टेस्ट मॅचमध्ये 708 विकेट्स घेतल्या आहेत. एकदिवसीय सामन्यात त्याने 293 विकेट घेतल्या.

भारताविरुद्ध 1992 मध्ये केले होते पदार्पण , 2007 मध्ये निवृत्त
शेन वॉर्नने 1992 मध्ये भारताविरुद्धच्या सिडनी कसोटीतून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. जानेवारी 2007 मध्ये त्याने सिडनीमध्येच इंग्लंडविरुद्ध शेवटचा कसोटी सामना खेळला होता.