नवाब मलिकांच्या कोठडीत 7 मार्चपर्यंत वाढ
ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप
3 March :- अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या कुटुंबीयांकडून जमीन खरेदी केल्याप्रकरणी मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात अटक करण्यात आलेले अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्या ईडी कोठडीत 7 मार्चपर्यंत वाढ करण्यात आली आहे. वैद्यकीय तपासणीनंतर काही वेळापूर्वी त्यांना पुन्हा न्यायालयात हजर करण्यात आले.
मलिक यांच्या पुढील कोठडीबाबत न्यायालयात दोन तास युक्तिवाद सुरू होता. अतिरिक्त सॉलिसिटर जनरल अनिल सिंग ईडीच्या वतीने हजर झाले, तर अमित देसाई आणि तारक सय्यद यांनी मलिक यांची बाजू मांडली.
कोर्टातील सुनावणीदरम्यान अतिरिक्त सॉलिसिटर जनरल अनिल सिंह यांनी 1993च्या बॉम्बस्फोटांशी संबंधित एक गोपनीय जबाब कोर्टासमोर ठेवला आहे. मलिक आजारी असल्याने आणि रुग्णालयात दाखल असल्याने त्यांचे जबाब नोंदवता येणार नाहीत, असे सांगून एएसजी यांनी न्यायालयाला त्यांच्या कोठडीत सहा दिवसांची वाढ करण्यास सांगितले. ही बाब लक्षात घेऊन न्यायालयाने मलिक यांच्या कोठडीत चार दिवसांची वाढ केली आहे.