देश विदेश

युक्रेनमध्ये तणाव वाढला; रणगाड्यांसह लुहान्स्क, डोनेत्स्कमध्ये घुसले रशियन सैनिक

ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

22 Feb :- रशियन सैन्याने युक्रेनच्या लुहान्स्क-डोनेत्स्क (डॉनबॉस क्षेत्र) या दोन प्रांतात प्रवेश केला आहे. राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी 13 तासांपूर्वी (भारतीय वेळेनुसार रात्री 3 वाजता) युक्रेनच्या या दोन राज्यांना स्वतंत्र देश म्हणून घोषित केले होते. यानंतर रशियन सैन्याचे रणगाडे या भागांकडे सरकत आहेत. लुहान्स्क-डोनेत्स्क आणि फुटीरतावाद्यांच्या ताब्यातील भागात शांतता राखणे आवश्यक असल्याचे पुतीन म्हणाले होते.

यासंदर्भात युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष जेलेन्स्की यांनी रशियाने उचललेल्या पावलांना घाबरत नसल्याचे म्हटले आहे. ते म्हणाले, आम्ही कोणाकडून काही घेतले नाही आणि कोणाला काही देणार नाही. रशियाच्या घोषणा आणि धमक्यांना न जुमानता युक्रेनच्या आंतरराष्ट्रीय सीमा पूर्वीप्रमाणेच राहतील, असे जेलेन्स्की म्हणाले. युक्रेनच्या दोन प्रांतांना स्वतंत्र घोषित करण्याच्या पुतिनच्या हालचालीनंतरच, संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेने तातडीची बैठक बोलावली आहे.

तातडीच्या बैठकीत भारताने रशियाच्या या कारवाईवर चिंता व्यक्त केली. UNSC मधील भारताचे प्रतिनिधी TS तिरुमूर्ती म्हणाले – या पाऊलामुळे शांतता आणि सुरक्षिततेचा भंग होऊ शकतो. हा प्रश्न राजनैतिक वाटाघाटीतूनच सोडवला जाऊ शकतो. दुसरीकडे, रशियाचे हे पाऊल युक्रेनमध्ये घुसखोरीचे निमित्त असल्याचे अमेरिकेने म्हटले आहे. आम्ही आणि आमचे मित्र यावर सहमत आहोत की, रशियाने अधिक घुसखोरी केल्यास त्याला त्वरीत आणि योग्य उत्तर देण्यात यावे. ही अशी वेळ आहे जेव्हा कोणी किनाऱ्यावर उभे राहून शांतपणे पाहू शकत नाही.