बीड

पैशांच्या वादावरून एकाचे अपहरण

ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

30 Jan :- ऊस तोडणीसाठी पाच लाख रु. घेऊन मजूर न पाठविल्यामुळे केज तालुक्यातील ढाकेफळ येथे एकाला मारहाण करुन जीवे मारण्याची धमकी देत जातीवाचक शिवीगाळ करून त्याचे अपहरण केले आहे. या प्रकरणी अपहृत व्यक्तीच्या पत्नीच्या तक्रारी वरुन चौघा विरुद्ध अपहरण व अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला आहे.

दि. 28 जानेवारी रोजी सकाळी 10 वा. च्या दरम्यान युसुफवडगाव पोलीस ठाणे हद्दीतील ढाकेफळ ता. केज येथे उदय पाटील, स्वप्नील पाटील आणि त्यांचे सोबतचे इतर दोघे यांनी पांडुरंग घाडगे यांना त्याने ऊस तोडणीसाठी पाच लाख रु. घेऊनही ऊस तोडणीसाठी मजूर का पाठविले नाही? असे म्हणून लाथा-बुक्क्याने मारहाण केली. तसेच पैसे का दिले नाही? म्हणून लाने गच्चीला पकड़न खाली पाडले.

स्वप्नील पाटील याने जातीवाचक बोलून अश्लील भाषेत शिवीगाळ केली आणि पांडुरंग घाडगे याला त्यांच्या गाडीत बसवून अपहरण केले. तसेच जो पर्यंत पैसे देत नाही; तो पर्यंत सोडणार नाही. अशी धमकी दिली.

दरम्यान, या प्रकरणी पाच लाख रु. साठी अपहरण करण्यात आलेले पांडुरंग घाडगे यांची पत्नी सौ. मैनाबाई घाडगे हिने दि. 29 जानेवारी रोजी युसूफवडगाव पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारी वरून सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय आटोळे यांनी तक्रार नोंदवून घेतली आहे.