बालविकास अधिकाऱ्याकडुन केराची टोपली
छोट्या खोलीत तीस अंगणवाडी कार्यकर्तींची पर्यवेक्षीकेकडुन बैठक प्रकरणी तहसीलदाराच्या आदेशास
बालविकास अधिकाऱ्याकडुन केराची टोपली
तेलगाव, – कोरोनाच्या लाँकडाऊन मध्ये कंटेनमेंट झोनमधुन येवुन पर्यवेक्षीका श्रीमती टी.ए.जमादार यांनी सोशल डिस्टन्सिंग न पाळता तीस कार्यकर्ती व मदतनीसाची बैठक घेतल्याप्रकरणी तहसीलदारांनी दिलेल्या पत्रास केराची टोपली दाखवली आहे.
परवानगी नसतांनाही अंगणवाडी कार्यकर्ती व मदतनीसांची बैठक घेतल्याचा प्रकार समजताच बालविकास प्रकल्प अधिकारी लक्ष्मणराव कदम यांनी सबंधीत पर्यवेक्षीका श्रीमती जमादार यांना नोटीस देवून खुलासा मागविला होता .त्यांना तो समाधानकारक देता आला नाही.सोबतच आपत्ती व्यवस्थापन समीतीच्या अध्यक्ष तहसीलदार श्रीमती शेडोळकर यांनी पुरावे पाहुन दिलेल्या पत्रासही केराची टोपली दाखवली.अशाच प्रकरणात जिल्हाधीकाऱ्यांनी कंटेनमेंट झोन मधुन अंबडला ये जा केल्याप्रकरणी तहसीलदाराचे निलबंन केले होते. किल्लेधारुर येथील एकात्मीक बालविकास प्रकल्पातील पर्यवेक्षीकेस दुसरा न्याय देता येत नाही.यासंदर्भात अंगणवाडी कार्यकर्ती व मदतनीस संघटनेने संघर्षाची भुमीका घेवुन या प्रकरणी न्याय मागीतला आहे. या संदर्भात बोलताना संघटनेच्या अध्यक्षा सिंधु घोळवे म्हणाल्या वरीष्ठ अधीकारी यांची परवानगी न घेता,शासन आदेशाची पायमल्ली करुन कोरोनाच्या राष्टीय आपत्तीच्या काळात मुख्यालयी न राहता कंटेनमेंट झोनमध्ये असलेल्या कळंब हुन ये जा करणाऱ्या व सोशल डिस्टन्सींगचे आदेश पायदळी तुडविणाऱ्या श्रीमती जमादार यांच्यावर निलंबनाचीच कार्यवाही झाली पाहिजे.अन्यथा संघटनेच्या वतीने असहकार ,बेमुदत उपोषन करण्यात येणार आहे.