क्राईमNewsPopular NewsRecent NewsTrending News

आईची हत्या करत वडिलांवर हातोडा चाकू आणि स्क्रू ड्राइवरने वार

ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

21 सप्टेंबर : दोन वर्षांपूर्वी आपल्या आईचा खून करून फरार झालेल्या विकृत मुलाला अखेर नालासोपारा पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहे. या विकृत मुलाने आधी आईचा खून केला आणि त्यानंतर स्क्रू ड्रायव्हर, चाकू आणि हातोडीने वार करून वडिलांना जखमी करून पळ काढला होता. अखेर पश्चिम बंगालमधून या आरोपीला अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 29 जानेवरी 2019 मध्ये नालासोपारा पश्चिम भागातील इम्पीरियल टॉवर भागात ही घटना घडली होती. या परिसरात राहणाऱ्या जन्मेश पवार या 20 वर्षीय तरुणाने आपल्या जन्मदात्या वडिल नरेंद्र पवार यांच्यावर स्क्रू ड्रायवर,चाकू आणि हातोडीने गंभीर वार केला होता. या हल्ल्यात नरेंद्र पवार हे गंभीर जखमी झाले होते. जन्मेश एवढ्यावरच थांबला नाही. तर त्याने आई नम्रता पवार यांचाही खून केला होता. आई-वडिलांचा खून केल्यानंतर जन्मेश पळून गेला होता. तब्बल 32 महिन्याच्या तपासानंतर नालासोपारा पोलिसांनी त्याला पश्चिम बंगालमधून अटक केली आहे.

जन्मेश याला शेअर मार्केटमध्ये पैसे कमवण्याचा नाद लागला होता. पण, आई वडिलांनी त्याला समज दिला होता. तसंच, शेअर मार्केटमध्ये पैसे न गुंतवण्याचा सल्ला दिला होता. त्याचाच राग मनात धरून जन्मेशने आपल्या आई-वडिलांवरच प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्यात आईचा मृत्यू झाला होता. तर वडील गंभीर जखमी झाले होते.