महाराष्ट्र

महाराष्ट्र पुन्हा लॉकडाउनच्या दिशेने; रुग्णसंख्येत मोठी वाढ

ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

6 Jan :- राज्यातील कोरोनाच्या रुग्णसंख्येत दिवसेंदिवस मोठी वाढ होताना दिसत आहे. राज्यात आज दिवसभरात 36,265 नव्या रुग्णांची नोंद झाली असून 13 बाधितांचा मृत्यू झाला आहे. तर राज्यात गेल्या 24 तासात 8,907 रुग्ण कोरोनामुक्तही झाले आहे. दरम्यान, राज्यात आज ओमायक्रॉनचे 79 नवीन रुग्ण सापडले आहेत. त्यापैकी 57 रुग्ण हे एकट्या मुंबईतील आहेत. राज्यात आजपर्यंत ओमायक्रॉनच्या एकूण 876 रुग्णांची नोंद झाली आहे.

ओमायक्रॉनच्या 79 रुग्णापैकी 57 रुग्ण मुंबईतील आहेत. तर ठाणे महानगरपालिकेतील 7, नागपूर सहा, पुणे महानगरपालिका 5, पुणे ग्रामीण 3 आणि पिंपरी चिंचवडमधील एका रुग्णाचा यामध्ये समावेश आहे.मुंबईत गुरुवारी 20,181 नवीन संक्रमित रुग्ण आढळले आहेत. तर 4 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. येथे सक्रिय प्रकरणांची संख्या 79,260 झाली आहे.

आज मुंबईत 67 हजार लोकांची चाचणी करण्यात आली, त्यापैकी 20181 लोकांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. म्हणजेच आज सकारात्मकता दर 29.90% नोंदवला गेला. आश्चर्याची बाब म्हणजे यापैकी 17,154 (85%) रुग्णांमध्ये कोणतीही लक्षणे आढळून आली नाहीत. काल हा आकडा 90 टक्के होता. त्याच वेळी, मुंबईतील आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी असलेल्या धारावीमध्ये विक्रमी 107 रुग्ण आढळले आहेत. संसर्ग सुरू झाल्यापासूनचा हा सर्वोच्च आकडा आहे.