महाराष्ट्र

मतदान कार्डाला आधारकार्डशी जोडणे बंधनकारक

ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

20 Dece :- निवडणूक संशोधन विधेयक 2021 हा कायदा लोकसभेत आज मंजूर करण्यात आला आहे. निवडणूकीत बोगस मतदानाला आळा घालण्यासाठी या कायद्यांतर्गंत आता मतदान कार्डाला आधार कार्ड लिंकची तरतुद करण्यात आली आहे. केंद्रीय मंत्रिमंडाळाने गेल्या आठवड्यात बुधवारी निवडणूक संशोधन कायद्याला मंजूरी दिली होती.


कायदा मंत्री किरण रिजिजू आज लोकसभेत एक बिल पास केले आहे. ते म्हणाले की, या कायद्याला विरोध करण्यासाठी सदस्यांनी दिलेली कारणमीमांसा म्हणजे, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाची चुकीची माहिती देण्याचा प्रयत्न असल्याचे ते म्हणाले.

हे विधेयक सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसारच असल्याचे किरण रिजिजू म्हणाले. मतदार यादी अधिक पारदर्शक व्हावी आणि बनावट मतदार काढून टाकता यावेत यासाठी निवडणूक आयोगाने मतदार ओळखपत्र आधारशी लिंक करण्याची शिफारस केली होती. मतदार ओळखपत्राशी आधार लिंक केल्याने एखाद्या व्यक्तीला एकापेक्षा जास्त मतदार ओळखपत्र ठेवता येणार नाही.