भारत

देशात टोम्याटोंनी गाठली सेंच्युरी; का महाग झाले टमाटे?

ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

23 Nov :- टोम्याटोंला देखील अच्छे दिन आले आहे. देशात टोमॉटोने सेंच्युरी गाठली असून, 100 रुपये प्रतिकिलोने टमाटे विकत घ्यावे लागत आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांच्या स्वयंपाकगृहातील अर्थचक्र काहीसे बदलले आहे. देशात सर्वाधिक महाग टमाटे अंदमान आणि निकोबारची राजधानी पोर्ट ब्लेयर येथे मिळत आहे. किलो टमाटे घेण्यासाठी चक्क 113 रुपये मोजावे लागत आहे. तर देशाच्या राजधानी दिल्लीत काहीसा दिलासा पाहायला मिळतोय. दिल्लीत टोमॉटोचे दर हे 65 ते 90 रुपये किलो इतके आहे.

टमाटे व्यतिरिक्त इतर भाज्यांचे दर सामान्य आहेत. मात्र, टोमॉटोमुळे अनेक घरातील अर्थचक्र बिघडले आहे. टमाटे उत्पादक शेतकरी सोनू यादवने सांगितले की, यंदा पावसाने हाहाकार माजवला होता. त्यामुळे अनेक ठिकाणी शेतीचे तसेच भाजेपाल्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सध्या देशभरात दक्षिणात्य राज्य टॉमाटोचे पुरवठा करत आहे. सध्या लग्नकार्य सुरू असल्याने मोठ्या प्रमाणात टोमॉटोची मागणी वाढली आहे. त्यामुळे देशात टमाटे महाग झाले आहे.

टोमॉटोचे आऊक व्यापाऱ्यांच्या मते पुढील टोमॉटोचे पीक निघायाला दोन महिन्यांचा कालावधी आहे. त्यामुळे जानेवारी-फेब्रूवारी दरम्यान दर कमी होऊ शकतात. कारण 15 ऑक्टोंबर दरम्यान टॉमाटोची लागवड करण्यात येते आणि बाजारात येण्यास त्याला तीन महिन्यांचा कालावधी लागतो. सध्या लग्नकार्य तसेच हॉटेल्स, रेस्टोरंट मोठ्या प्रमाणात खुले झाल्याने देखील टोमॉटोची मागणी वाढली आहे.

नॅशनल रिसर्च आणि डेव्हलपमेंट फाउंडेशननुसार, चीन नंतर भारत दुसऱ्या क्रमांकाचा मोठा टमाटे उत्पादक देश आहे. भारतात सुमारे 7.89 लाख हेक्टरवर टोमॉटोची लागवड करण्यात येते. साधारण: 25.05 टन प्रति हेक्टरप्रमाणे 1.975 कोटी टन देशभरात टमाटे उत्पादन केले जाते. असे असताना देखील आज टोमॉटोच्या किंमती 100 च्या पुढे गेल्या आहेत.