महाराष्ट्र

11 ऑक्टोबर रोजी महाराष्ट्र बंद

ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

9 Oct :- महाविकास आघाडीने सोमवार 11 ऑक्टोबर रोजी महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. याची माहिती आघाडीच्या नेत्यांनी एकत्रितपणे पत्रकार परिषद घेऊन दिली. या पत्रकार परिषदेला शिवसेना खासदार संजय राऊत, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक आणि काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत उपस्थित होते.

लखीमपूरमध्ये शेतकरी शांततापुर्वक काळे झेंडे दाखवून आंदोलन करत होते. मात्र, केंद्रीय मंत्र्याच्या मुलाने शेतकऱ्यांच्या अंगावर गाडी घातल्यामुळे शेतकऱ्यांचा मृत्यू होऊन मोठा नरसंहार झाला. याविरोधात केंद्र सरकारने अद्याप कारवाई केली नाही. शेतकऱ्यांचा आवाज बंद करण्याचा प्रयत्न होत आहे. यामुळे महाविकास आघाडीकडून शेतकऱ्यांना पाठींबा देण्यासाठी आणि घटनेचा निषेध म्हणून सोमवारी बंद पुकारला आहे.

या बंदला महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांचा पाठींबा असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि काँग्रेस पक्षातील प्रतिनिधींनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली. दरम्यान, या बंदमधून अत्यावश्यक सेवा वगळण्यात आल्या आहेत.