IPL वर पुन्हा एकदा कोरोनाचे संकट..!
ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप
२२ सप्टेंबर | एप्रिल-मे महिन्यात भारतात आयपीएलचा मोसम सुरु असताना काही खेळाडूंना कोरोनाची बाधा झाल्याने सामने स्थगित करण्यात आले होते.३ मी रोजी स्थगित केलेली आयपीएल स्पर्धा १९ सप्टेंबर मध्ये पुन्हा चालू करण्याचे योजिले होते मात्र १९ सप्टेंबर पासून सुरु झालेल्या आयपीएल स्पर्धे मध्ये हि कोरोना विषाणूने प्रवेश केला आहे. सनरायजर्स हैदराबादचा वेगवान गोलंदाज टी. नटराजनला कोरोनाची लागण झाली आहे. नटराजनचा आरटी-पीसीआर रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. बीसीसीआयने ही माहिती दिली आहे. कोविड पॉझिटिव्ह असला, तरी सध्या नटराजनमध्ये कोणतीही लक्षणे आढळलेली नाहीत. त्याने स्वत:ला विलगीकरण केले आहे. आता हे सर्व सामने दुबईमध्ये होत आहेत.
सनरायजर्स हैदराबाद संघासाठी हा एक धक्का आहे. आजपासून दिल्ली कॅपिटल्स संघाविरुद्ध मोहिम सुरु करण्याच्या काहीतास आधी नटराजनचा कोविड रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. ठरल्याप्रमाणे सामना दुबई इंटरनॅशनल स्टेडियममध्ये खेळवला जाईल असे बीसीसीआयने म्हटले आहे. अन्य खेळाडूंचा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे.
“नटरानच्या संपर्कात असलेल्यांची स्थानिक वेळेनुसार पहाटे पाच वाजता आरटी-पीसीआर चाचणी करण्यात आली. त्यांचा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे” अशी माहिती बीसीसीआयने दिली आहे. सहाजण सतत नटराजनच्या संपर्कात होते. अष्टपैलू विजय शंकरला विलगीकरणामध्ये ठेवण्यात आले आहे. संघ व्यवस्थापक विजय कुमार, श्याम सुंदर, अंजना वन्नन, तृषार खेडकर आणि गोलंदाज पेरीयासामी गणेशन नटराजनच्या सतत संपर्कात होते.