बीडNewsPopular NewsRecent NewsTrending Newsपाऊसभारतमराठवाडामहाराष्ट्र

बीड जिल्हाधिकाऱ्यांचा नवा आदेश

ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

अतिवृष्टीमुळे बीड तालुक्यातील विविध गावांमध्ये झालेले शेती पिकाचे नुकसान तसेच बंधाऱ्यांची झालेली तुट याची प्रत्यक्ष पाहणी जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांच्यासह अन्य प्रमुख अधिकार्‍यांच्या पथकाने रविवारी दिवसभरात केली. या दरम्यान औरंगपूर बंधाऱ्यासह शेती नुकसानीचे विशेष बाब म्हणून फेर पंचनामे करा, असे आदेश जिल्हाधिकारी शर्मा यांनी यंत्रणेला दिले. बीड जिल्ह्यामध्ये मागील आठ दिवसांमध्ये जोरदार पावसाने हजेरी लावल्यामुळे अनेक महसुली मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली. त्यामुळे नदी नाल्यांना पूर आला. एकाच वेळी जोरदार पाऊस झाल्यामुळे पाण्याचा दबाव अतिरिक्त झाल्याने बीड तालुक्यासह जिल्हाभरातील लहान-मोठे बंधाऱ्यांचे नुकसान तर शेतीपिकांचे ही अतोनात नुकसान झाले आहे.

बीड तालुक्यातील कुर्ला शिवरातून येथून सिंदफणा नदीचा प्रवाह आहे. या नदीवर ३९ लोखंडी दरवाजे असणारा केटीवेअर बंधारा आहे. मागील वर्षी या बंधाऱ्याच्या दरवाजाची दुरुस्ती कामे करण्यात आली होती. त्याचवेळी बंधाऱ्याच्या संरक्षण भींतीचा काही भाग ढासाळल्याची ग्रामस्थ, शेतकरी, सरपंच, ग्राम पंचायत सदस्य संगातात मात्र त्याचवेळी दुरुस्तीचे काम केले गेले नाही. पाटबंधारे विभागाकडे दोन वेळा भींत दुरुस्तीसाठी निवेदने दिली.

परंतु त्याची दखल घेतली गेली नाही त्यामुळे आज या दुर्घटनेला सामोरे जावे लागले तर मृद व जलसंधारण अधिकारी म्हणतात की बंधाऱ्याचे स्ट्रकचर व अॅंकरेज भींत सुरक्षीत आहे, अतीवृष्टीमुळे नद्यांना पुर आल्याने ही स्थिती निर्माण झाली. कुर्ला शिवारातील औरंगपुर येथील चार सप्टेंबर २०२१ रोजी रात्री केटीवेअर बंधाराच्या दक्षीण बाजु भिंतलगत मातीभराव फोडून नदीचे पाणी शेतात घुसले. या दुर्घटनेची पाहणी मंगळवारी (दि. सात) बीड प्रभारी तहसीलदार एन.टी. डोके, जिल्हा मृद व जलसंधारण अधिकारी अजित परांडे, उपविभागीय जलसंधारण अधिकारी एस.आर. अमले, जलसंधारण अधिकारी जगदीश जाधव, जलसंधारण अधिकारी सुशांत जाधव, तलाठी सचीन सानप, सरपंच अनील पाटील या अधीकाऱ्यांनी पाहणी करुन पंचनामा केला होता.

रविवारी जिल्हाधिकारी यांच्या दौऱ्यामध्ये निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे, विभागीय अधिकारी नामदेव टिळेकर, जिल्हा जलसंधारण अधिकारी अजित परांडे, जिल्हा कृषी अधीक्षक अधिकारी जेजुरकर, बीड तहसीलदार शिरीष वमने यांच्यासह इतर प्रमुख अधिकारी यांचा दौऱ्यामध्ये समावेश होता.

यावेळी शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी यांच्या समक्ष नुकसानीचे पंचनामे करून तत्काळ मदत मिळावी अशी मागणी केली. रविवारी दिवसभरात जिल्हाधिकारी यांच्या पथकाने बीड तालुक्यातील कुर्ला, सांगवी, जवळा, सांडरवण, बोडकोचीवाडी, रामगाव, पिंपळणेर या गावांमधील अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी केली.