atmosphereNewsPopular NewsRecent NewsTrending Newsबीडभारतमराठवाडामहाराष्ट्र

बीडमध्ये 4 जण गेले वाहून!

ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

मराठवाड्यात मुसळधार पावसाने धडाका लावला आहे. बीड जिल्ह्याला पावसाने जोरदार झोडपून काढले विविध ठिकाणी नदीला आलेल्या पुरात चार जण वाहून गेल्याच्या घटना घडल्या आहेत. यात दोन जणांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आले तर दोन जणांचा बुडून मृत्यू झाला आहे. यात एका महिलेचा व तरुणाचा समावेश आहे.सलग 24 तासांपासून जोरदार पाऊस असल्याने बीड शहरातून वाहणाऱ्या बिंदुसरा नदीला पूर आला असून शहरातील दगडी पुलावरून पाणी वाहत आहे. पाऊस अशाच पद्धतीने वाहत राहिला तर बीड शहरातील रहिवाशी वस्तीला पुराचा धोका असल्याने सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.तालुक्यातील कपिलधार येथील नदीमध्ये दोन तरुण वाहून गेले यात ओकार विभूते या तरुणाला वाचविण्यात यश आले असून यशराज कुडकेचा शोध सुरू आहे.

दुसऱ्या घटनेत वडवणी तालुक्यातील परडी माटेगाव येथील महिलेचा पाय घसरून नदी पडली, यात तिचा बुडून मृत्यू झाला. मनिषा अशोक शेंडगे (वय 32 वर्ष) असं मयत महिलेचं नाव आहे.तिसऱ्या घटनेत केज तालुक्यातील वाघे बाभुळगाव या ठिकाणी पापनाशी नदी पुलावरून पाणी वाहत असताना इंडिका गाडी पुलावरून घालणं महागात पडलं सुदैवाने यात ड्रायव्हर वाचण्यात गावकऱ्यांना यश आलं आहे.वडवणी तालुक्यात पिंपरखेड गावांमध्ये महापुराचे पाणी शिरले असून कालच महापुराच्या दुर्घटनेत तीन लोकांचा मृत्यू झाला होता. आज पुन्हा पुराचे पाणी गावात शिरल्यामुळे दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सर्व गावकरी भयभीत होऊन गावाच्या बाहेर आले असून सुरक्षितस्थळी थांबले आहेत. वडवणी तालुक्यातील राजा हरिश्चंद्र पिंपरी, साळींबा या गावांमध्येही पाणी शिरले होते. तालुक्याच्या अनेक गावाचा संपर्क या पुरामुळे तुटला आहे.