NewsPopular NewsRecent NewsTrending Newsमहाराष्ट्र

फॅक्टरीला भीषण आग

ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

२८ ऑगस्ट | अमरावती शहरातील जुन्या बायपासलगतच्या एमआयडीसीत मोठी घटना घडली आहे.एमआयडीसीत शनिवारी मध्यरात्री 2 वाजता केमिकल फॅक्टरीला भीषण आग लागली. दरम्यान, या आगीत कंपनीतील सामानांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. ही आग इतकी मोठी होती की, या आगीचा धूर 2 किलोमीटर अंतरावरुन दिसून येत होता. आकाशात सर्वत्र काळा धूर पसरला होता. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या अनेक गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांकडून आग आटोक्यात आण्यण्यासाठी प्रयत्न सुरुच होते. काही तासांनी या आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले.
आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अमरावती शहरासहीत बडनेरा, चांदुर रेल्वे, नांदगाव खंडेश्वर, तिवसा, धामणगाव येथील अग्निशमन दलाच्या अनेक गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. एमआयडीसीतील केमिकल फॅक्टरीला शनिवारी मध्यरात्री 2 वाजता आग लागली. या आगीत कंपनीतील साहित्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. परंतु, ही आग कशामुळे लागली याबाबत अद्याप अधिकृत असे काहीही सांगण्यात आले नाही. कंपनीतील ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागली असल्याचा प्राथमिक अंदाज अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. सदर कंपनीचे फायर ऑडिट झाले नसल्याचे माहिती समोर येत आहे.