NewsPopular NewsRecent NewsTrending Newsभारतमहाराष्ट्र

यंदाही गणेशोत्सव, दसरा-दिवाळी करोना नियमांसोबत साजरी करावी लागणार

ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

देशात करोनाची दुसरी लाट ओसरली असा समज झाला असताना केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने महत्त्वपूर्ण माहिती पत्रकार परिषदेत दिली आहे. करोनाची दुसरी लाट अजूनही ओसरली नसल्याचं आरोग्य मंत्रालयाने स्पष्ट केलं आहे. त्यामुळे सणासुदीच्या काळात काळजी घेण्याची आवश्यकता असल्याची सूचना करण्यात आली आहे. त्यामुळे यंदाही गणेशोत्सव, दसरा-दिवाळी करोना नियमांसोबत साजरी करावी लागणार आहे.

लसीकरण झाल्यानंतरही मास्क आणि करोनाचे नियम पाळणं आवश्यक असल्याचं सांगण्यात आलं आहे.“करोनाची दुसरी लाट अजूनही ओसरली नाही. करोना रुग्णसंख्येत नेहमीच सणासुदीनंतर वाढ झाल्याचं दिसून येतं. त्यामुळे सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यातील सण जबाबदारीने साजरे करणं गरजेचं आहे”, असं आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी पत्रकार परिषदेदरम्यान सांगितलं.

“लसीकरणामुळे रोगाची तीव्रता कमी होते आणि रुग्णालयात दाखल करण्याची स्थिती ओढावत नाही. त्यामुळे लसीकरण झाल्यानंतरी मास्क आणि करोना नियमावलीचं पालन करणं आवश्यक आहे”, असंही त्यांनी पुढे सांगितलं. केरळमधील करोना स्थितीवरही केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने चिंता व्यक्त केली आहे. “सध्या देशात रोज येणाऱ्या करोना प्रकरणात केरळमधून ५१ टक्क्याहून अधिक रुग्ण आहेत”, असंही आरोग्य मंत्रालयाकडून सांगण्यात आले.