बीड

बीड कोरोना रिपोर्ट; रुग्णसंख्येचा आलेख घसरणीला

ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

26 Aug :- बीड जिल्ह्यातील कोरोनाचा आकडा दरदिवशी कमी -जास्त होताना दिसून येत आहे. आज (दि.२६) १०५ कोरोनारूग्ण आढळून आले आहेत. बुधवारी ४ हजार ५६४ जणांनी कोरोना चाचणीसाठी नमुने दिले होते. त्याचे अहवाल आज (दि.२६) प्राप्त झाले, त्यामध्ये १०५ नमुने पॉझिटिव्ह आढळून आले. तर ४ हजार ४५९ नमुने निगेटिव्ह आले आहेत.

बाधितांमध्ये बीड तालुक्यात २५, अंबाजोगाई ७, आष्टी ३८, धारूर ४, गेवराई २, केज ९, परळी ३, पाटोदा ५, शिरूर १ तर वडवणीतील ११ रुग्णांचा समावेश आहे. तर माजलगाव तालुक्यात कोरोनाचा एकही रुग्ण आढळला नाही. मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार यांनी ही माहिती दिली.