भारत

कोरोनाच्या चौथ्या लसीला मान्यता

ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

29 June : कोरोनाच्या भारत बायोटेक च्या कोवॅक्सिन,सिरम इन्स्टिटयूट ऑफ इंडिया व अस्त्राझेनेका यांची कॉव्हिडशील्ड आणि रशियाच्या स्पुतनिक व्ही नंतर आता चौथ्या लसीला मान्यता देण्यात आली आहे. डीआरडीओने 2-डीजी औषध तयार केले आहे. त्याच्या आणीबाणीच्या वापरासही मान्यता देण्यात आली आहे. हे एक पावडर आहे, जे पाण्यात विरघळून दिले जाते.सिप्ला ने मॉडर्ना च्या आयात व विक्री साठी परांवानगी मागितली होती., अमेरिकन सरकारनेही मॉडर्ना कोविड -19 लसीचे डोस ठरवलेल्या संख्येत भारताला डोनेट करण्याची मंजूरीही दिली आहे.

मॉडर्ना आणि फायझरचा अशा कंपन्यांमध्ये समावेश आहे, ज्यांनी भारत सरकारला आवाहन केले होते की, त्यांनी आपत्कालीन वापरास परवानगी दिल्यानंतर होणारी स्थानिक चाचण्यांची गरज भागवावी. लस वापरल्यानंतर होणाऱ्या दुष्परिणामांची हानी किंवा जबाबदारी यासारख्या परिस्थितीबाबत सरकारने अद्याप निर्णय घेतला नाही. डीसीजीआयने 1 जून रोजी म्हटले होते की जर मॉडर्नाच्या लसीला प्रमुख देश आणि जागतिक आरोग्य संघटनेने आपत्कालीन वापरास मान्यता दिली असेल तर भारतात याला लॉन्चिंगनंतर ब्रिजिंग ट्रायलची गरज भासणार नाही.फायझर आणि मोडर्ना यांनी अशी अट घातली आहे की जर नुकसानभरपाई मिळाली तरच ते लस भारतात पाठवतील. ही नुकसानभरपाई लस कंपन्यांना सर्व कायदेशीर उत्तरदायित्वापासून मुक्त करते. भविष्यात या लसीमुळे काही गडबड झाल्यास या कंपन्यांकडून नुकसान भरपाईची मागणी केली जाऊ शकत नाही.