महाराष्ट्र

राज्यात विमानतळ नामकरणा बाबत वाद वाढला

ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

महाराष्ट्रात नामकरण करण्याविषयी वाद हे काही नवीन नाही ते मुबई ते नागपूर एक्सप्रेस असो किंवा इतर अनेक वाद राजकीय पक्षात झाले. पण जेंव्हा महापुरुषांचे नाव देण्याची वेळ येते तेंव्हा हा विषय संवेदशील बनतो असच नवी मुंबई विमानतळ नामकरण बाबत झाले .नवी मुंबई विमानतळाचा वाद आता शिगेला पोहोचला आहे.

विमानतळ एक आहे, मात्र त्याच्या नामकरणाबाबत चार वेगवेगळ्या मागण्या समोर येत आहेत. शिवसेना बाळासाहेब ठाकरे यांच्या नावासाठी आग्रही आहे. तर भाजप आणि नवी मुंबईतील भूमीपुत्र हे दि बा पाटील यांच्या नावाची मागणी करत आहेत. मनसेनं छत्रपती शिवाजी महाराज यांचं नाव देण्याची मागणी केली आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी जे आर डी टाटा यांचं नाव देण्याचं मत मांडलं आहे.