राजकारणभारत

तिसऱ्या आघाडीविषयी ‘या’ नेत्याने केले भाकीत

ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

23 June : काँग्रेसचे मोठे नेते व आपण ज्यांना शॉटगन म्हणून ओळखतो असे शत्रुघ्न सिन्हा यांनी तिसऱ्या आघाडीविषयी एक महत्वपूर्ण भविष्यवाणी केली आहे.काँग्रेस नेते शत्रुघ्न सिन्हा यांच्या भाकितांनुसार आता कुठं विरोधी पक्ष एकत्र येण्या सुरुवात झाली असून या आघाडीत अनेक पक्ष जोडले जातील.राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या निवासस्थानी राष्ट्रमंचच्या नेत्यांची बैठक सुरू आहे. तिसरी आघाडी स्थापन करण्यासाठीची ही बैठक नसल्याचा दावाही केला जात त्र येत आहेत.

सर्वांची एकजूट होणं ही वाखाणण्यासारखी गोष्ट आहे. हा चांगला निर्णय घेण्यात आला आहे. आज सुरुवात झालीय. यापुढे आणखी लोक यात समील होतील, असे ते म्हणाले. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या मोठ्या नेत्या आहेत. त्यांचा राजकीय अभ्यास दांडगा आहे. त्याही आमच्यासोबत आहेत. जर नसतील तर येतील, असा दावाही त्यांनी केला.देशात काँग्रेस हा राष्ट्रीय पक्ष आहे. मीही या बैठकीला जाणार होतो. पण काही कारणास्तव पोहोचू शकलो नाही. मात्र, या घडामोडीतून चांगलं निष्पन्न होईल. दक्षिण बहुतेक पक्षही जोडले जातील.

भाजपने धन शक्ती आणि भय शक्तीचा प्रयोग केला. मात्र, आता काही लोकांचे डोळे उघडले आहेत. प्रत्येक निवडणुकीत लोकांना फोडलं जातं. हे योग्य नाही, असंही त्यांनी सांगितल काँग्रेसमधील नेतृत्वाचं संकट दूर होईल तुमच्या वैचारिक आस्थेने एखाद्या पक्षात आला तर ठिक आहे. सध्या सर्वात प्रतिभावान लोक काँग्रेसमध्ये आहेत. यातील काही लोकांची नेतृत्व करण्याची इच्छा आहे. मात्र, त्यावर तोडगा निघेल.