मराठवाडा

भावी अधिकाऱ्याचे आश्चर्यकारक आंदोलन

ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

19 June : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने पेपर घेऊन निकाल देखील लावला पण या सर्व घटनेला वर्ष झाले तरी या भावीं अधिकाऱ्यांना नियुक्ती देण्यात अली नाही. याच्या वर्षपूर्ती साधून सर्व भावी अधिकाऱ्यांनी औरंगाबाद आयुक्त कार्यालयासमोर केक कापून अशे आंदोलन केले आणि आपला विरोध दर्शवला.महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून राज्यसेवा २०१९ परीक्षा ४१३ पदांसाठी घेण्यात आली. या परीक्षेचा अंतिम निकाल १९ जून २०२० रोजी जाहीर झाला. उपजिल्हाधिकारी, पोलिस उप अधीक्षक, तहसीलदार, नायब तहसीलदार अशा महत्वाच्या पदांवर निवड होऊन वर्ष झाले. परंतु अद्याप नियुक्ती नाही.

नियुक्तीबाबत शासन उदासिनता दाखवित असल्याने उमेदवारांनी शनिवारी राज्यभरात औरंगाबाद, पुणे, नागपूर, नाशिक अशा विविध ठिकाणी वर्षपूर्ती निमित्त केक कापला.केकवर हताश अधिकारी असा उल्लेख होता. हा केक पात्र उमेदवारांनी औरंगाबादमध्ये विभागीय आयुक्त कार्यालयासमोर कापत वर्षीपूर्ती साजरी करत या प्रकरणी तात्काळ नियुक्ती देण्याची मागणी केली. पाच-सहा वर्ष अभ्यास करून सरकारी सेवेत रूजू होण्याचे स्वप्न पाहिले परंतु शासन दरबारी नियुक्तीला वर्ष-वर्षभर सामोरे जावे लागत असल्याचे उमदेवारांनी सांगितले. निवड होऊनही ठरूनही नियुक्ती नसल्याने आर्थिक, सामाजिक आणि मानसिक तणावाला सामोरे जावे लागत असल्याचे उमेदवारांचे म्हणणे आहे.