निर्दयी महिलेने 2 चिमुकल्यांना दिले गच्चीवरून खाली फेकून।
14 महिन्याचा बाळाचा मृत्यू
3 May :- दोन मजली इमारतीच्या गच्चीवरून एका 20 वर्षीय महिलेने दोन मुलांना खाली फेकत स्वतःही उडी मारल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेत महिला आणि तिची दोन वर्षाची मुलगी गंभीर जखमी झाली असून 14 महिन्याचा बाळाचा मृत्यू झाला आहे. औरंगाबाद जवळील वाळूज परिसरातील बजाजनगर परिसरात ही घटना घडली आहे.
ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप
शेजाऱ्यांसोबत भांडण झाल्याने रागाच्या भरात या महिलेने हे पाऊल उचललं आहे. वाळूज परिसरातील बजाजनगरच्या जिजामाता हाऊसिंग सोसायटीत अनिता सतीश आतकर (वय 20) ही पती सतीश नागनाथ आतकर (27), मुलगी प्रतिक्षा आतकर (वय दोन वर्ष) व मुलगा सोहम आतकर (14महीने) यांच्यासह भाड्याच्या घरात राहते. आतकर हे पंढरपूर जिल्ह्यातील सोलापूर येथील मुळ रहिवासी आहे. तिचा पती सतीश आतकर हा कामगार असून तो कामाला गेला होता.
अनिताचे शेजारी राहणाऱ्यांबरोबर भांडण झाल्याने अनिता ही प्रतीक्षा व सोहम या दोन्ही मुलांना घेऊन दोन मजली इमारतीच्या गच्चीवर गेली. प्रथम तिने 12 महीण्याच्या सोहमला खाली फेकले. त्यानंतर दोन वर्षीय प्रतिक्षाला फेकून स्वतः वरून वरुन उडी घेतली. या घटनेत सोहम हा जागीच गतप्राण झाला. तर प्रतिक्षा व अनिता या दोघेही गंभीर जखमी झाले आहेत. दोघांवर सध्या