महाराष्ट्र

रुग्णवाहिकेत भीषण स्फोट

गाडीचे अवशेष जाऊन पडले पन्नास फूट लांब

10 April :- औरंगाबाद जिल्ह्यातील गंगापूर तालुक्यातील भेंडाळा प्राथमिक आरोग्य केंद्राची रुग्णवाहिका इंधन भरण्यासाठी वाळूजलगतच्या एका पेट्रोल पंपाकडे जाताना मागच्या बाजूला ठेवलेल्या इन्व्हर्टर अाणि बॅटरीजवळ शाॅर्टसर्किट हाेऊन अाग लागली. बाजूला असलेले अाॅक्सिजन सिलिंडर गरम हाेऊन माेठा स्फाेट हाेवून गाडीचे अवशेष पन्नास फूट लांब जाऊन पडले. यामुळे अाैरंगाबाद-अहमदनगर मार्गावरील वाहतूक अर्धा तास खोळंबली हाेती.

झुंजारनेता वर क्लीक करून वॉट्सअँप ग्रुप ज्वाईन करा!

भेंडाळा आरोग्य केंद्राची रुग्णवाहिका (एमएच १४ सीएल ०७९३) घेऊन चालक सचिन गोरखनाथ कराळे (४२) व डॉ. प्रशांत पोपटराव पंडुरे (३९ दोघेही रा. गंगापूर) हे दोघे इंधन भरण्यासाठी औरंगाबाद-नगर महामार्गाने वाळूजलगतच्या पेट्रोलपंपावर निघाले. रुग्णवाहिका वाळूज गावाच्या बाहेर येताच चालकाला मागील बाजूने धूर निघत असल्याचे दिसले. त्याने तत्काळ रुग्णवाहिका रस्त्याच्या कडेला उभी केली. दाेघे तत्काळ बाहेर पडले. त्याच वेळी रुग्णवाहिकेने पेट घेतला. महामार्गावरून ये-जा करणाऱ्या वाहनधारकांनी त्यांची वाहने लांब उभी केल्याने सुदैवाने यात काेणालाही दुखापत झाली नाही.

स्थानिक वाळूज व वाळूज एमआयडीसीचे पोलिस, अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत तीन बंबांच्या मदतीने आग आटोक्यात आणली.डिझेल भरल्यानंतर रुग्णाला आणणार होते : रुग्णवाहिकेत डिझेल भरल्यानंतर ते एका काेराेना रुग्णाला घेण्यासाठी जाणार हाेते. दुर्दैवाने त्यानंतर जर अाग लागून असा स्फाेट झाला असता तर रुग्ण व त्याच्यासाेबतच्या नातेवाइकांनाही गंभीर इजा झाली असती.पत्रा अंदाजे ५० फूट उंच उडून इतर वाहनांवर आदळला रुग्णवाहिकेत अाॅक्सिजनचे दाेन जंबाे तर एक लहान सिलिंडर, इन्व्हर्टर अाणि बॅटऱ्या हाेत्या.

या बॅटऱ्यांमुळे शाॅर्टसर्किट हाेऊन अाग लागली. नंतर अाॅक्सिजन सिलिंडर गरम झाले. अग्निशमन दलाचे जवान पाण्याचा मारा करत असतानाच अचानक मोठ्या आवाजासह स्फोट झाला. रुग्णवाहिकेचा पत्रा अंदाजे ५० फूट उंच उडून महामार्गावरील इतर वाहनांवर आदळला. सुदैवाने यात कोणालाही इजा झाली नाही. मात्र, आगीच्या ज्वाला व स्फोटाच्या अावाजामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले हाेते. दरम्यान, अाॅक्सिजन सिलिंडर गरम झाल्यानंतर त्यांचा स्फाेट हाेऊ शकताे, अशी माहिती अॅडाेरा फार्माचे संचालक अानंद नागापूरकर यांनी दिली.