महाराष्ट्र

एकदाच 12 मृतदेहांवर अंत्यसंस्कार

मृतदेह नेले जातात कोंबून

9 April :- नगरमध्ये आता मृत्यूचे थैमान माजले असून आरोग्य यंत्रणा आणि अमरधाममधील अंत्यविधी करणारी व्यवस्थाच कोलमडली आहे. महापालिकेकडे एकच शववाहिनी आहे. त्यात एकाचवेळी अनेक मृतदेह कोंबून नेले जातात. विद्युतदाहिनीची व्यवस्था आणि ओटेही अपुरे पडत असल्याने जमिनीवरच मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्याची वेळ आली आहे. जिल्ह्यात कोरोना रुग्ण संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे.

झुंजारनेता वर क्लीक करून वॉट्सअँप ग्रुप ज्वाईन करा!

गुरूवारी एकाच दिवशी २२३३ तर काल शुक्रवारी २०२२ रुग्णांना कोरोना झाल्याची नोंद झाली. त्यात मृत्यूचे प्रमाण देखील धक्कादायक होते. एकाच दिवशी 12 कोरोना रुग्णांवर अमरधाम स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्याची वेळ आली. अमरधाममधील २ विद्युत दाहिनीत २० आणि उरलेल्या मृतदेहांवर लाकडाच्या सरणावर मृतदेह रचून अंत्यसंस्कार करण्यात आले.

दरम्यान, नगरमध्ये चार-चार मंत्री असूनही कोरोनामुळे रुग्ण मरत आहेत. एकाच दिवशी १२ मृतदेहांवर अंत्यसंस्कार झाले ही घटना दुर्दैवी असल्याची प्रतिक्रिया माजी मंत्री भाजपनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली आहे. अंत्यसंस्कारासाठी शववाहिकेतून मृतदेह नेले जातात.

नंबर येऊपर्यंत मृतदेह तसेच शववाहिकेत तासंतास पडून असतात. बहुतांश रुग्ण ग्रामीण भागातील असल्याने त्यांच्या नातेवाईकांनीही नगर शहरात येऊन तासंतास ताटकळत बसावे लागते. प्रशासानाकडून आढावा बैठका घेण्याचा नुकताच फार्स केला जातो. त्यात करोना बाधिकत रुग्णांच्या अंत्यसंस्काराच्या व्यवस्थेकडे फारसे लक्ष दिले जात नसल्याचे स्पष्ट होते आहे. त्यामुळे जिल्ह्यातील एकूणच प्रशासन व्यवस्थेबद्दल संतापाचे वातावरण पसरले आहे.