उपसरपंच निवडीवरुन ग्रामपंचायत सदस्याची हत्या
पोलिसांनी गावात जाऊन जमाव पांगवला
4 March :- कवठेमहांकाळ तालुक्यातील बोरगाव याठिकाणी उपसरपंच निवडीवरून झालेल्या मारामारीमध्ये एका ग्रामपंचायत सदस्याची हत्या झाली आहे. पांडुरंग काळे असे मयत सदस्याचे नाव आहे. तर या मारामारीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे ग्रामपंचायत सदस्यही गंभीर जखमी झाले आहेत. ज्यामध्ये 4 ते 5 जण जखमी झाले आहेत. जखमींना सांगलीच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. भाजपा गटाच्या कार्यकर्त्यांकडून ही हत्या झाल्याचा आरोप जखमी राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्यांनी केला आहे.
‘दै.झुंजारनेता’ वर क्लिक करा आणि मिळवा ‘वॉटसअँपवर’ लाईव्ह अपडेटस
पांडुरंग काळे यांच्यासह चार जणांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटाला या उपसरपंच निवडीमध्ये पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे आपल्या गटातून चार सदस्य फुटले आणि राष्ट्रवादीचा उपसरपंच होणार या रागात भाजपच्या कार्यकर्त्यांनी हल्ला चढवला आणि ज्यामध्ये ग्रामपंचायत सदस्य पांडुरंग काळे यांचा मृत्यू झाला आहे. कवठेमहांकाळ तालुक्यातील बोरगाव ग्रामपंचायतीच्या उपसरपंच निवडीवेळी भाजप आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार राडा झाला असून यात एका ग्रामपंचायत सदस्यांचा मृत्यू झाला आहे.
जनार्दन काळे (वय 57) असे खून झालेल्या ग्रामपंचायत सदस्याचे नाव आहे. तसेच आठ ते दहा कार्यकर्तेही जखमी झाले आहेत. तासगाव-कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादीच्या आमदार सुमनताई पाटील आणि भाजपचे खासदार संजय पाटील यांच्या कार्यकर्त्यांमध्ये उपसरपंच निवडीवरुन हा सगळा धक्कादायक प्रकार घडला आहे.
या मारामारीत गणेश पाटील हे आणखी एक सदस्य गंभीर जखमी झाले आहेत. शिवाय आठ ते दहा कार्यकर्तेही जखमी झाले आहेत. घटना घडल्यानंतर कवठेमहांकाळ पोलिसांनी गावात जाऊन जमाव पांगवला. सध्या गावात तणावपूर्ण वातावरण असून गावात पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. पोलीस अधिक्षक दीक्षित गेडाम घटनास्थळी जाऊन घटनेचा तपास करत आहेत.