क्रीडा

BCCI च्या बैठकीत मोठा निर्णय; आता IPL मध्ये खेळणार 10 संघ

दहा संघांचे IPL मध्ये असतील आता 94 सामने

24 Dece :- आता 2022 पासून आयपीएलमध्ये 10 संघ खेळणार आहेत. अहमदाबाद येथे आज झालेल्या बीसीसीआयच्या एजीएम बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. आयपीएलमध्ये आतापर्यंत 8 संघ खेळत आहेत. दहा संघांचे आयपीएलमध्ये 94 सामने असतील ज्यासाठी सुमारे अडीच महिने लागणार आहेत.

‘दै.झुंजारनेता’ वर क्लिक करा आणि मिळवा ‘वॉटसअँपवर’ लाईव्ह अपडेटस

याचा परिणाम आंतरराष्ट्रीय क्रिकेट वेळापत्रकावर होण्याची शक्यता आहे. यासह आयपीएलच्या संपूर्ण कालावधीसाठी दिग्गज परदेशी खेळाडूंची उपलब्धता सुनिश्चित करणेही आवश्यक आहे.

प्रसारणाची रक्कम दर वर्षी 60 सामन्यांसाठी असते. आता पुन्हा नव्याने याचं नियोजन करावे लागणार आहे. सध्या स्टार इंडियाने सन 2018-2022 दरम्यानच्या कालावधीसाठी 16,347.50 कोटी रुपये दिले आहेत.

ही किंमत दरवर्षी होणाऱ्या 60 सामन्यांसाठी आहे. गौतम अदानी आणि संजीव गोएंका (माजी फ्रेंचायझी राइझिंग पुणे सुपरगिजंट्सचे मालक) ही काही मोठी नावे आहेत ज्यांना संघ खरेदी करण्यात रस आहे. बीसीसीआयच्या सूत्रानुसार, कोरोना महामारीमुळे घरी राहावं लागलेल्या सर्व प्रथम श्रेणी क्रिकेटपटूंना (पुरुष आणि महिला दोघांनाही) योग्य मोबदला दिला जाणार आहे.


आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने (आयओसी) काही स्पष्टीकरण दिल्यानंतर बीसीसीआय 2028 च्या ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटचा समावेश करण्यासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे (आयसीसी) समर्थन करेल,असे सूत्रांनी सांगितले.