राजकारण

शरद पवार शेतकऱ्यांचा जाणता राजा नव्हे तर विश्वासघात करणारा राजा

सदाभाऊ खोत यांनी केली पवारांवर टीका

24 Dece :- पवार साहेबाचं मनावर घेऊ नका, ते जे बोलतात त्याच्या नेहमी उलटं करतात अशी टीका रयत क्रांती संघटनेचे सदाभाऊ खोत यांनी केली आहे. ते सांगली येथे भाजपच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या किसान आत्मनिर्भर यात्रेमध्ये बोलत होते. सदाभाऊ खोत म्हणाले की, “शरद पवार यांनी जर म्हंटलं की सूर्य उद्यापासून पूर्वेकडे उगवणार तर सूर्य पश्चिमेकडे उगवणार. पवारांचे आत्मचरित्र वाचावं की न वाचावं असा प्रश्न पडलाय, कारण पवारांनी त्यांच्या आत्मचरित्रमध्ये म्हटलंय की मार्केट कमिट्या बंद झाल्या पाहिजेत, अडत असो वा हमाली ही शेतकऱ्यांकडून घेतली नाही पाहिजे.

‘दै.झुंजारनेता’ वर क्लिक करा आणि मिळवा ‘वॉटसअँपवर’ लाईव्ह अपडेटस

कुणालाही शेतकऱ्यांचा शेतमाल खरेदी करता आला पाहिजे. आता दुसरीकडं पवार म्हणतात माझा दिल्लीतील शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा आहे.” सांगली येथे गुरुवारी भाजपच्या किसान आत्मनिर्भर यात्रेचा शुभारंभ झाला. यावेळी भाजपचे आमदार आशिष शेलार उपस्थित होते. याप्रसंगी सदाभाऊ खोत पुढं म्हणाले की, “पवार यांनी खरं बोलावं. कारण ज्यावेळी महाराष्ट्राचा इतिहास लिहला जाईल त्यावेळी पवारांना शेतकऱ्यांचा जाणता राजा नव्हे तर शेतकऱ्यांचा विश्वासघात करणारा राजा म्हटलं जाईल.” या प्रसंगी उपस्थित भाजपचे नेते आशिष शेलार यांनी माजी खासदार राजू शेट्टी यांच्यावर टीका करत त्यांचा उल्लेख पिंजरा चित्रपटातील ‘मास्तर’ असा केला.

केंद्र सरकारच्या नव्या कृषी कायद्यांना विरोध करत दिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्यांनी आंदोलन सुरु केलंय. आज या आंदोलनाचा 30 वा दिवस आहे. या नव्या कृषी कायद्याविषयी सरकारची नेमकी भूमिका नागरिकांना समजवून सांगण्यासाठी भाजपच्या वतीनं देशभरात किसान आत्मनिर्भर यात्रा सुरु करण्यात आली आहे.