राजकारण

केंद्रीय मंत्री स्मृती इराणींविरोधात गुन्हा केला दाखल

2 जानेवारी रोजी होणार सुनावणी

23 Dece :- आंतरराष्ट्रीय निशाणेबाज वर्तिका सिंह यांनी थंडीच्या ऋतूत अमेठीतील राजकारण गरम केलं आहे. वर्तिकाने बुधवारी केंद्रीय मंत्री आणि अमेठीच्या खासदार स्मृती इराणी आणि त्याचे खासगी सचिवांसह तिघांवर भ्रष्टाचाराचा आरोप लावला आहे. याबाबत तिने गुन्हाही दाखल केला आहे. वर्तिकाने आरोप केला आहे की, केंद्रीय महिला आयोगाचं सदस्य होण्यासाठी त्यांच्याकडून 25 लाखांची मागणी करण्यात आली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार वर्तिकाच्या वकिलांनी कोर्टात स्मृती यांच्या जवळील सदस्यांनी केलेल्या अश्लील चॅटिंगचा पुरावादेखील सादर केला आहे.

‘दै.झुंजारनेता’ वर क्लिक करा आणि मिळवा ‘वॉटसअँपवर’ लाईव्ह अपडेटस

संपूर्ण प्रकरण एमपी-एमएएल कोर्टात दाखल झाली आहे. कोर्ट या प्रकरणावर 2 जानेवारी 2021 रोजी सुनावणी करणार आहे. प्रतापगडची राहणारी वर्तिका सिंह हिचा आरोप आहे की, स्मृती इराणींच्या जवळील लोकांनी तिला केंद्रीय महिला आयोगाची सदस्य होण्याची ऑफर दिली होती. पहिल्यांदा मोठ-मोठ्या गोष्टी करुन आंतरराष्ट्रीय शूटर यांना भटकविण्यात आलं, त्यानंतर पदावर घेण्यासाठी 1 कोटी रुपयांचा रेट असल्याचं सांगितलं. मात्र चांगली प्रोफाइल असतानाही वर्तिकाकडून 25 लाखांची मागणी करण्यात आली. इतकच नाही तर वर्तिकाचा आरोप आहे की, स्मृती यांच्या जवळील लोकांनी त्यांच्यासोबत एका सोशल साइटवर अश्लील संभाषण केलं.

वर्तिकाने भ्रष्टाचाराचा खेळ समोर आल्याचं आव्हान दिलं आहे. यामुळे स्मृती इराणींच्या जवळील विजय गुप्ता यांनी मुसाफिरखाना पोलीस ठाण्यात वर्तिकाविरोधात गुन्हा दाखल केला होता. वर्तिका सिंह यांनी सांगितलं की, या प्रकरणाबाबत अनेकदा मोठ मोठ्या अधिकाऱ्यांसमोर तक्रार केली आहे. मात्र यावर काही कारवाई केली जात नसल्याने त्यांनी कोर्टाचं दार ठोठावलं. विशेष न्यायाधीश पीके जयंत यांनी क्षेत्राधिकारबाबत सुनावणी बाबत 2 जानेवारीची तारीख नक्की केली आहे. वर्तिकाचे वकील रोहित त्रिपाठी यांनी कोर्टात वर्तिकाकडून आपलं म्हणणं मांडलं आहे.