बीड

परळीमध्ये कुलरच्या कारखान्यात आगीचे महातांडव

80 लाखांचा माल जळून झाला खाक

23 Dece :- परळी शहरातील औद्योगिक वसाहतीमध्ये असलेल्या साई कुलर या कारखान्यास बुधवारी (दि.23 )रोजी सायंकाळी अचानक आग लागल्याने लाखो रुपयांचे सामान व कुलर जळुन खाक झाल्याची घटना घडली आहे. परळी शहरातील औद्योगिक वसाहतीत सोळंके बंधू यांचा साई कुलर नावाचा कुलर उत्पादन करणारा कारखाना आहे.

‘दै.झुंजारनेता’ वर क्लिक करा आणि मिळवा ‘वॉटसअँपवर’ लाईव्ह अपडेटस

या कारखान्यास आज बुधवारी सायंकाळी 5.30 च्या सुमारास अचानक आग लागली. आगीचे लोट व धुरामुळे कारखान्यातील कामगारांना आग विझवता आली नाही. पाहता-पाहता आगीने अवघ्या 15 मिनिटात रौद्र रूप धारण केले. या कारखान्यात प्लास्टिक,लोखंडी कुलर बनवले जातात. सध्या हिवाळ्याचे दिवस असल्याने या काळात कुलर तयार करुन ते उन्हाळी हंगामात विकले जातात.

दरम्यान आगीमुळे कारखान्यातील 80 लाख रुपयांचा कच्चा व इतर माल जळून खाक झाला आहे. आग विझवण्यासाठी परळी नगर पालिकेचे अग्निशामक दल प्रयत्न करत असुन ही आग आटोक्यात आल्यानंतरच आग कशामुळे लागली याचे कारण समजणार आहे.