बीड

पाटोदा तालुक्यातील डोंगरीकिन्ही येथे झाला गोळीबार

जमीनीच्या वादातून हा गोळीबार झाल्याचा वर्तवल्या जातोय अंदाज

23 Dece बीड जिल्ह्यात कधी काय होईल याचा नियम नाही आताच कळालेल्या माहितीनुसार आज (दि.23) सायं ४.३० च्या सुमारास पाटोदा तालुक्यातील डोंगरीकिन्ही बसस्थानक परिसरामध्ये गोळीबार झाल्याची घटना धक्कादायक घडली. यामुळे बसस्थानक परिसरामध्ये मोठी खळबळ उडाली आहे तर नागरिकांमध्ये दहशदीचे वातावरण निर्माण झाले आहे.

‘दै.झुंजारनेता’ वर क्लिक करा आणि मिळवा ‘वॉटसअँपवर’ लाईव्ह अपडेटस

घटनास्थळी अंमळनेर पोलीसांनी तातडीने धाव घेतली आहे. जमीनीच्या वादातून हा गोळीबार केला असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. याची माहिती मिळताच अंमळनेर पोलीस ठाण्याचे सपोनि. श्यामकुमार डोंगरे यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आहे. पोलीस पुढील तपास करत असून या घटनेने जिल्ह्याभरात मोठी खळबळ उडाली आहे.

धक्कादायक! पंकजा ताईंच्या साखर कारखान्यात मोठी चोरी