कोरोनाने घेतला सचिनच्या जवळच्या मित्राचा जीव
ठाण्यातील एका रुग्णालयात निधन झाले
23 Dece :- भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि महान फलंदाज सचिन तेंडुलकरने कोरोना व्हायरसमुळे आपला अत्यंत जवळचा मित्र गमावला आहे. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि विनोद कांबळी यांच्यासोबत खेळणारा मुंबईचा माजी वेगवान गोलंदाज विजय शिर्के यांचे रविवारी रात्री ठाण्यातील एका रुग्णालयात निधन झाले. त्यांना काही दिवसांपूर्वीच कोरोनाची लागण झाली होती.
‘दै.झुंजारनेता’ वर क्लिक करा आणि मिळवा ‘वॉटसअँपवर’ लाईव्ह अपडेटस
गेले काही दिवस त्यांच्यावर उपचारही सुरु होते पण अखेर त्यांची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली. विजय शिर्के हे ५७ वर्षांचे होते. दरम्यान, याचवर्षी ऑक्टोबरमध्ये कोरोना व्हायरसमुळेच अवि कदम या आपल्या आणखी एका मित्राला सचिन तेंडुलकरने गमावले होते.टाइम्स ऑफ इंडियाने शिर्केच्या जवळच्या मित्राच्या हवाल्याने सांगितले की, शिर्के काही वर्षांपूर्वी ठाण्यात राहायला आले होते आणि येथील एका रुग्णालयातच त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
शिर्केच्या मित्राने सांगितले की, ‘विजय शिर्के हे कोरोनामधून बरे होत होते, परंतु नंतर त्यांना पुन्हा अधिक त्रास जाणवू लागला होता आणि अखेर त्यांचं निधन झालं.’ कल्याणमध्ये जन्मलेले शिर्के हे मुंबई क्रिकेट असोसिएशन (MCA) अंडर-१७ च्या समर कॅम्पचे दोन वर्ष प्रशिक्षक होते.