भारत

‘कोरोना लस’ घेतल्यानंतर ‘मद्यसेवन’ करण्यास ‘इतके’ दिवस मनाई

७ दिवसांआधी मद्यसेवन बंद करावं लागणार

22 Dece :- वर्ष संपत आल तरी जगात कोरोनाचे थैमान सुरु आहे. अनेकांना आपला जीव गमवावा लागला. एवढेच नाही तर अनेक देशांच्या अर्थव्यवस्था डबघाईला आल्या. यातून अजूनही सावरलेले नाही. त्यामुळेच वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने कोरोना व्हायरसला महामारी घोषित केलं आहे. वर्ष संपताना एक चांगली बातमी आली आहे ती म्हणजे कोरोना वॅक्सीन आता लवकरच येणार आहे. परंतु ही बातमी मद्यप्रेमींना निराश करणारी आहे.

‘दै.झुंजारनेता’ वर क्लिक करा आणि मिळवा ‘वॉटसअँपवर’ लाईव्ह अपडेटस

भारतात तयार होणाऱ्या ‘भारत बायोटेक’ची स्वदेशी वॅक्सीन ‘कोवॅक्सीन’ घेतली तर १४ दिवसांपर्यंत मद्यसेवन करण्यास पूर्णपणे मनाई असणार आहे, असे इंडियन कॉउन्सिल फॉर मेडिकल रिसर्चचे आरोग्य अधिकारी डॉ. समिरन पांडे यांनी सांगितले. रशिया हा कोरोना वॅक्सीन देणं सुरू करणारा पहिला देश ठरला आहे. रशियात स्वदेशी वॅक्सीन ‘स्पूतनिक वी’ तयार झाली आहे आणि रशियात ती देण्याालाही सुरूवात झाली आहे. रशियात सर्वातआधी आरोग्यकर्मी, सुरक्षाकर्मी आणि शिक्षकांना वॅक्सीन दिली जाईल. वॅक्सीन घेतल्यानंतर २ महिने मद्यसेवन करू नये. अशा स्पष्ट सूचना आया देशातही देण्यात आल्या आहेत.

भारतात कोरोना वॅक्सीन घेण्यासंबंधी मेडिसीनच्या एका तज्ज्ञांनी सांगितले की, वॅक्सीन घेण्याच्या ७ दिवसांआधी मद्यसेवन बंद करावं लागेल. नाही तर याने शरीरात अॅंटी बॉडी तयार होण्यास अडचण निर्माण होईल. ही बाब तळीरामांना निराश करू शकते. पण हेही सत्य आहे की, कोरोना व्हायरसला हलक्यात घेऊ नका. ती फार मोठी चूक ठरेल. दरम्यान कोरोनाची दुसरी लाट आली आहे. यामध्ये कोरोनाच्या जिवाणूमध्ये बदल झाले आहेत. त्याचे संक्रमणही वेगाने होत असल्याने ब्रिटनमधील परिस्थिती गम्भीर बनली आहे. अनेक युरोपियन देशांनी पुन्हा लॉकडाऊन केला आहे.