क्राईम

भेटण्यासाठी बोलावून तरुणीवर केला बलात्कार

पोलिसांचा तपास सुरु

22 Dece :- तरुणीला भेटण्यासाठी बोलावून तिच्यावर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना पर्वती टेकडी परिसरात घडली आहे. याप्रकरणी दत्तवाडी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. योगेश मोहन मंद्रे (वय 22, रा. निखील पार्क, माणिकबाग) असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी 22 वर्षीय तरुणीने तक्रार दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार तरुणी मॉलमध्ये आणि योगेश एका कंपनीत काम करतो.

‘दै.झुंजारनेता’ वर क्लिक करा आणि मिळवा ‘वॉटसअँपवर’ लाईव्ह अपडेटस


मॉल व कंपनी हे शेजारी असल्यामुळे त्यांची ओळख झाली होती. त्यातून त्यांची मैत्री झाली होती. त्यानंतर योगेशने 24 नोव्हेंबरला रात्री तरुणीला पर्वती टेकडीवर भेटण्यासाठी बोलविले होते. त्यानुसार तरुणी त्याला भेटण्यासाठी गेली.त्यानंतर आरोपीने तिला पुणे येथील पर्वती टेकडीच्या जंगलात घेऊन जात बलात्कार केला. घटनेनंतर तरुणी घरी गेली होती. त्यानंतरही योगेश तिला सतत त्रास देत असल्यामुळे तिने पोलिसांकडे जाऊन तक्रार दिली. याप्रकरणी दत्तवाडी पोलिस तपास करीत आहेत.