क्रीडा

विश्वनाथन आनंद यांच्यावर आधारित बायोपिकची घोषणा

विश्वनाथन यांची भूमिका कोण साकारणार याबद्दल घोषणा झालेली नाही

सिनेरसिकांच्या बदलत चाललेल्या आवडीनुसार चित्रपट निर्मात्यांनी आणि दिगदर्शकांनी चित्रपट निर्मितीला सुरवात केली आहे. सिनेरसिकांमध्ये हल्ली बायोपिक पाहण्याची तुफान क्रेझ आहे. म्हणूनच दंगल, भाग मिल्का भाग, संजू, मेरी कॉम चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट बनली आहेत. बायोपिकच्या या क्रेझी वातावरणात आणखीन भरपूर बायोपिक चित्रपट आगामी काळात प्रदर्शित होणार आहेत. यापैकीच एका नवीन बायोपिक चित्रपटाची घोषणा झाली आहे. भारताचा सुप्रसिद्ध आणि विश्वविजेत बुद्धिबळपटू विश्वनाथन आनंद यांच्यावर आधारित बायोपिकची घोषणा करण्यात आली आहे.

‘दै.झुंजारनेता’ वर क्लिक करा आणि मिळवा ‘वॉटसअँपवर’ लाईव्ह अपडेटस

या बायोपिकचं दिग्दर्शन चित्रपट निर्माते आनंद एल राय करणार आहेत. याबाबत माहिती देत ​​व्यापार चित्रपट समीक्षक तरण आदर्श यांनी रविवारी ट्विट केले, विश्वनाथन आनंद यांच्या जीवनावर बायोपिक लवकरत प्रेक्षकांच्या भेटीसाठी येणार आहे. ‘ए बायोपिक ऑन इंडियन चेस ग्रँडमास्टर विश्वनाथन’ या अनटायटल्ड बायोपिकचं दिग्दर्शन आनंद एल करणार आहेत.सुंदर एंटरटेनमेंट (महावीर जैन) आणि कलर यलो प्रॉडक्शन (आनंद एल. राय) हा बायोपिक निर्मिती करणार आहेत. क्रिकेट आणि सचिन ही दोन शब्द ज्याप्रमाणे एकरूप झाली आहेत अगदी त्याच प्रमाणे बुद्धिबळ आणि विश्वनाथ आनंद एकजीव झालेलं समीकरण आहे.

विश्वनाथ आनंद यांनी एक नाही दोन नाही तर पाच वेळा वर्ल्ड चेस टूर्नामेंट जिंकली आहे. विश्वनाथन बुद्धिबळातील एक असे प्रतिभावंत खेळाडू आहेत जे आपल्या केवळ चालीने खेळाचा संपूर्ण डाव फिरवतात. यांच्यावर आधारित तयार होणारा बायोपिक नक्कीच प्रेक्षकांच्या आवडीस पात्र ठरेल. या बायोपिकमध्ये विश्वनाथन यांची भूमिका कोण साकारणार आहे याबद्दल घोषणा झालेली नाही.