क्रीडा

विराट म्हणतो, पराभवानंतर माझ्याकडे शब्द नाहीत!

उरलेल्या तिन्ही टेस्ट मॅचचं नेतृत्व करणार अजिंक्य रहाणे

भारतीय क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलीया विरुद्ध झालेल्या लाजिरवाण्या पराभवानंतर संपूर्ण क्रिकेटविश्वातून टीकेला सुरवात झाली आहे. क्रिकेटप्रेमींनी सोशल मीडियावर बिसिसिआई ला कर्णधार कोहली आणि प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्या हकालपट्टीची मागणी केली आहे तर माजी क्रिकेटर्सने सुद्धा संघात बदल करण्याचा सल्ला दिला आहे. क्रिकेट इतिहासात भारतीय टीम निच्चांकी स्कोअरवर आऊट झाली. पहिल्या इनिंगमध्ये 53 रनची आघाडी घेतल्यानंतर दुसऱ्या इनिंगमध्ये भाराताचा अवघ्या 36 रनवर ऑल आऊट झाला. या लाजिरवाण्या पराभवानंतर भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली याने प्रतिक्रिया दिली आहे. विराट म्हणतो, माझ्याकडे शब्दही नाहीत, अशी प्रतिक्रिया दिली.

‘दै.झुंजारनेता’ वर क्लिक करा आणि मिळवा ‘वॉटसअँपवर’ लाईव्ह अपडेटस

‘मला काय वाटत आहे, हे मी सांगू शकत नाही. आम्ही मैदानात उतरलो होतो, तेव्हा आमच्याकडे 60 पेक्षा जास्त रनची आघाडी होती, यानंतर टीम पत्त्याच्या बंगल्यासारखी कोसळली. आम्ही दोन दिवस चांगलं क्रिकेट खेळलो, पण एका तासात मॅच गमावली. या पराभामुळे खूप दु:ख झालं आहे,’ असं विराट म्हणाला. विराटने पराभवाबाबत बॅट्मनना दोष दिला. ‘बॅट्समननी रन काढण्याची जिद्दच दाखवली नाही. ऑस्ट्रेलियाच्या बॉलरनी पहिल्या इनिंगसारखीच बॉलिंग केली, पण पहिल्या इनिंगमध्ये आमचं लक्ष्य काहीही करून रन करणं हे होतं.

ऑस्ट्रेलियाने चांगली बॉलिंग केली, पण खेळपट्टीवर असं काही झालं नाही, ज्यामुळे एवढी वाईट कामगिरी झाली. कमी जिद्द आणि ऑस्ट्रेलियाच्या चांगल्या बॉलिंगमुळे आम्हाला सामना गमवावा लागला,’ असं वक्तव्य विराटने केलं. ‘पुढच्या टेस्टमध्ये भारतीय टीम पलटवार करेल, अशी माझी अपेक्षा आहे. बॉक्सिंग डे टेस्टचा निकाल आमच्या बाजूने असेल,’ असं विराट म्हणाला. ऑस्ट्रेलिया दौऱ्यातल्या उरलेल्या तिन्ही टेस्ट मॅचचं नेतृत्व अजिंक्य रहाणे करणार आहे. विराटची पत्नी अनुष्का शर्मा बाळाला जन्म देणार असल्यामुळे तो दौरा अर्धवट सोडून भारतात परतणार आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर भारतीय संघाची कामगिरी ढासळलेली दिसून आली टी२० मालिका सोडली तर वनडे मालिकेमध्ये आणि आता कसोटी मालिकेमध्ये सुद्धा भारत अपयशी झाल्याचे दिसून येत आहे.