भारत

मोठी बातमी! ब्रिटनमध्ये कोरोनाचा नवा विषाणू

घाबरून जाण्याची गरज नाही : आरोग्यमंत्री

21 Dece :- ब्रिटनमध्ये कोरोना विषाणूच्या नव्या प्रकाराच्या (स्ट्रेन) संसर्गाबाबत सरकार सतर्क असून घाबरून जाण्याची गरज नसल्याचे केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी सांगितले. ते म्हणाले की, गेल्या एका वर्षात कोविड -19 ला सामोरे जाण्यासाठी जे महत्वाचे होते त्या सर्व गोष्टी सरकारने केल्या आहेत.

‘दै.झुंजारनेता’ वर क्लिक करा आणि मिळवा ‘वॉटसअँपवर’ लाईव्ह अपडेटस

कोरोना विषाणूच्या नव्याने तयार होणाऱ्या संसर्गाविषयीच्या चिंतेच्या प्रश्नाला उत्तर देताना आणि ब्रिटनहून येणाऱ्या उड्डाणांवर बंदी घालण्याची मागणी करताना ते म्हणाले, की “मी हे सांगू इच्छितो की ही काल्पनिक परिस्थिती आहे, या सर्वांपासून स्वत: ला दूर ठेवा.” सरकारला सर्व गोष्टींची पूर्ण कल्पना आहे. या पत्रकार परिषदेत जी भिती व्यक्त केली जात आहे. तितकं घाबरुन जाण्याची काही गरज नसल्याचे हर्षवर्धन म्हणाले.