राजकारण

काँग्रेसचे वरिष्ठ नेते मोतीलाल वोरा यांचं निधन

वयाच्या 93 व्या वर्षी मोतीलाल वोरा यांनी घेतला शेवटचा श्वास

21 Dece :- काँग्रेसचे वरिष्ठ नेता मोतीलाल वोरा यांचं निधन झाल्याची बातमी समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार अचानक तब्येत बिघडल्याने मोतीलाल वोरा यांना काल रात्री एस्कॉर्ट रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. वयाच्या 93 व्या वर्षी मोतीलाल वोरा यांनी शेवटचा श्वास घेतला.

‘दै.झुंजारनेता’ वर क्लिक करा आणि मिळवा ‘वॉटसअँपवर’ लाईव्ह अपडेटस

कालचं त्याचा वाढदिवस होता. अधिक काळातपर्यंत काँग्रेसचे कोषाध्यक्ष असलेले मोतीलाल वोरा हे मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री आणि उत्तरप्रदेशचे राज्यपाल होते. मोतीलाल वोरा यांच्या निधनामुळे काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. यापूर्वी काँग्रेसचे चाणक्य अहमद पटेल (25 नोव्हेंबर) यांचा कोरोनाची लागण झाल्यानंतर निधन झालं होतं. त्यातून काँग्रेस सावरत असताना काँग्रेस पक्षावर आणखी एक आघात बसला आहे. वोरा यांच्या निधनामुळे काँग्रेसच्या देशपातळीवरील राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.